शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Tarot Card: श्रावणातला शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार? हे तुम्ही निवडलेल्या कार्डवरून ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:36 IST

Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार दिलेल्या कार्डपैकी मनाचा कौल मिळेल ते कार्ड निवडा आणि आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घ्या!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन10 ते 16 सप्टेंबर===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. वेगाने घडामोडी घडतील. जमीन, घर किंवा इतर कुठल्याही जागेच्या बाबतीत चांगली प्रगती होऊ शकते. एका वडीलधाऱ्या व्यक्तीचा दबदबा राहील. नियम आणि अनुशासन यांचं महत्त्व तुम्हाला जाणवेल. एक प्रकारचं स्थैर्य येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

या आठवड्यात तुम्ही एकदम करारीपणे वाटचाल करायची आहे. तुमचं परखड आणि प्रामाणिक मत मांडा. कसलीही भीती किंवा न्यूनगंड बाळगू नका. ध्येय निश्चित करून त्या दिशेने सगळे प्रयत्न करा. नियमांना सोडून मुळीच वागू नका. एक शिस्तबद्धपणा ठेवा. मोठ्यांचा आदर करा. भावनिक होऊन अडकू नका.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन उमेद घेऊन येत आहे. मागचं विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार रहा. एक प्रसन्न आणि उत्साहवर्धक घटना घडू शकते. चांगला सकारात्मक बदल घडू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संकल्पना सुचतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल.

या आठवड्यात तुम्ही नवीन काहीतरी सुरू करायचं आहे. तुमच्या मनात सुरू असलेले विचार आणि कल्पना लोकांपर्यंत पोचवा. मोकळेपणाने व्यक्त व्हा. सृजनशीलता बाळगा, वेगळ्या पद्धतीने काम करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा. गर्व न करता स्वतःचं केलेलं काम इतरांना दाखवा.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान मिळणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कंटाळा येऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो.

या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेलं काहीतरी एकदाचं सोडून द्या. कुठेही खूप गुंतू नका.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष