शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: हिंदू नववर्षाची सुरुवात दणदणीत; फक्त यशाने हुरळून जाऊ नका; निवडा तुमचे टॅरो कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:21 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून साप्ताहिक भविष्य जाणून घ्या!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन७ ते १३ एप्रिल===============

नंबर १:

काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. भौतिक मुबलकता राहील आणि त्यांचा उपयोग करण्याची योग्य बुध्दी ही राहील. हवे तसे ध्येय जरी साध्य करायला अवघड असेल तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने एकच बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. उलट सगळीकडे तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून नवीन वर्षाची सुरुवात करा!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी अधिकाराचा आणि वर्चस्वाचा असणार आहे. तुम्ही करत असलेले काम मोठे होईल. विस्तार होईल. तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल. बऱ्याच गोष्टींची सूत्रे तुमच्या हातात असतील. त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वडील किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींचा दबदबा राहील.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला स्वतः राजा आणि बाकीचे प्रजा अशी भावना येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. पण याचे रुपांतर पोकळ डौलात तर होत नाही ना याची तुमची दक्षता बाळगायला हवी. अती विश्वास, अभिमान, गर्व हे तुम्हाला बाधक ठरु शकतात. म्हणून पाय जमिनीवर ठेवा. सामर्थ्यवान अशी नवीन वर्षाची सुरुवात करा.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी घडामोडींचा आणि अनेक घटनांचा असण्याची शक्यता आहे. ज्या मार्गावर आहात किंवा ये करत आहात त्यात बदल घडू शकतो. वेगळी वाट, वेगळे वळण अचानक समोर येऊ शकते. मतभेद, काही वादविवाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. पण यातूनच तुम्ही मागचे सोडून काही गोष्टींचे पुनरुज्जीवन करणार आहात.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही बदल स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. बदल हा आयुष्याचा नियम आहे, हे लक्षात ठेवून वाटचाल करा. अचानक काही घटना घडल्यामुळे तुम्हाला हवा तसा वेळ मिळणार नाही पण तरी तुम्ही आत्मविश्वासाने अशा प्रसंगातून मार्गक्रमण करु शकणार आहात. मागची कात टाकून नवीन सुरुवात करण्यासाठीच तर हे नवीन वर्ष तुम्हाला सांगत आहे!

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष