साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२४ ते ३० ऑगस्ट===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी अवघड परिस्थिती आणतो आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे काहीही करण्याची इच्छा कमी झालेली असेल. तुमचे विचारचक्र सुरु होईल आणि तुम्ही त्यात अडकण्याची शक्यता आहे. एक प्रकारची परीक्षा होईल. पण गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही समतोल राखलात तर येणारा काळ चांगला जाईल हा विश्वास ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करु नका. मोठे निर्णय घेऊ नका. अंगावर जबाबदारी ओढवून घेऊ नका, पण स्वकर्तव्याला चुकू नका. इतरांच्या बोलण्याने, इतरांच्या वागण्याने स्वतःला त्रास करुन घेऊ नका. त्याने तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल. मनाप्रमाणे काही घडले नाही तरी सुद्धा तुम्ही सकारात्मक राहून या काळातून तरून जाणे गरजेचे आहे.
नंबर २: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. महत्त्वाचे कोर्टाचे काम होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांचे व्यवहार घडतील. पण या काळात कोणतेच काम पटकन होणार नाही. एका गोष्टीसाठी अनेक गोष्टींची गरज लागेल. प्रक्रियेला वेळ लागेल. गजाननाच्या कृपेने तुम्हाला मागे केलेल्या कर्माचे चांगले फळ मिळेल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही सारासार विचार करुन वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे. कोणत्याही बाबतीत घाईगडबड करु नका. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन काम करा. कोर्ट कचेरी कामात दुर्लक्ष नको. खोटेपणा सोडून सचोटीने वागा. मागे तुमच्या कडून काही चुका झाल्या असतील तर त्या खऱ्या मनाने मान्य करुन परिस्थिती स्वीकारा!
नंबर ३: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडथळे आणि अडचणी घेऊन येत आहे. हव्या तशा गोष्टी घडणार नाहीत. हव्या तशा वेगाने कामे पुढे सरकणार नाहीत. अडकलेली कामे तशीच राहण्याची शक्यता आहे. पण असं असूनही तुम्हाला त्याचा फार त्रास होणार नाही. आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करुन चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकणार आहात.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही एक नवीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आलेली अवघड परिस्थिती तुम्हाला नक्की शिकवायला आणि समृद्ध करायला आली आहे असा सकारात्मक विचार ठेवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश येईल. फक्त एक करा की संयम आणि धैर्य ठेवा कारण काहीही करताना विलंब होऊ शकतो.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.