शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:17 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन११ मे ते १७ मे===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

यशाने हुरळून जाऊ नका, नका करू गर्व,आर्थिक बाबतीत संयम ठेवा, जुळून येईल सर्व!

नंबर १:

काय घडू शकते? 

हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष एकाग्र न राहता विचलित जास्त होण्याची शक्यता आहे. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका.  पण तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.

नंबर २:

काय घडू शकते?

हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

नंबर ३:

काय घडू शकते?

हा सप्ताह तुमच्यासाठी मागे केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस हे या सप्ताहात मिळू शकतात. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील. कामातील एक टप्पा यशस्वीपणे गाठाल.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. लोकांनी मान दिला, मोठं केलं तर त्यांना खाली पाडू नका. त्यांना एकत्र घेऊन पुढे चाला. सगळ्यांना तुमचा आधार द्या. इतरांसाठी तुम्ही त्यांची ढाल बना. एक आदर्श नेतृत्व करा. अरेरावी करू नका. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!

सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष