शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Tarot Card: मन कौल देईल तेच कार्ड निवडा आणि पुढचा आठवडा कसा जाणार ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 17:03 IST

Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आगामी आठवड्याचा वेध घ्या आणि त्यानुसार आठवड्याचे प्लॅनिंग करा!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन9 ते 15 जुलै===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या समोर अशा घटना घडतील, किंवा अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा पूर्ण कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत, हे आत्ताच मनाला सांगा, याची तयारी ठेवा. विलंब होऊ शकतो, जे मिळायला हवं, त्यात काहीतरी कमी राहू शकतं, काहीतरी उणीव राहू शकते. कुठेतरी तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. तुम्हाला गरजे पुरतं मिळेल पण त्याहून जास्त नाही. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.

धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. कोणत्याही परिस्थितीत चिडचिड करू नका. उलट तुमच्या आजूबाजूला लोक चिडचिड करत असतील तर त्यांना शांत करा. कोणी चिडून बसलं असेल तर त्याची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. भांडणात सुवर्ण मध्य काढा. मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा आणि त्यातून तुमचं उत्तम काहीतरी तयार करा. ध्यान करा, मेडिटेशन करा.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीवादी दृष्टिकोन घेऊन येत आहे. असे प्रसंग किंवा अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. मनाचं न ऐकता, डोक्याने काम करावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये एक टप्पा गाठला जाईल.

तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा, खरे बोला. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. मोठ्यांसमोर नमतं घ्या, अरेरावी करू नका. वाद होत असेल तर मुद्दा सोडून बोलू नका, विषयापासून भरकटू नका. पक्षपात करू नका, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट बोला पण मनाला लागेल असं बोलू नका.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी निवांत वेळ घेऊन येत आहे. कामातून सवड मिळेल आणि त्यात तुमच्या आवडीचं काहीतरी करु शकाल. मागे केलेल्या कष्टाचे फळ काही प्रमाणात मिळेल. त्या निमित्ताने उत्साह राहील. कुठल्यातरी गोष्टीमुळे लहानसा उत्सव साजरा कराल. समारंभामध्ये सहभागी व्हाल किंवा तुम्ही स्वतः आयोजन कराल. तुमच्या आवडीच्या लोकांशी भेटी होतील. इतरांमुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. त्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. एकमेकांना सहाय्य कराल. इतरांच्या मदतीने असं काहीतरी कराल ज्याने तुम्हाला समाधान मिळेल. तब्येत सुधारेल.

एकटे राहू नका, लोकांना भेटायला जा. मन मोकळे हसा आणि मन मोकळे रडा देखील. लागेल तशी इतरांना मदत करा. गोड बोलून माणसं जोडा. त्यांना आधार द्या, त्यांचं दुःख हलकं करा. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये लोकांचे मत जाणून घ्या, त्यांना बोलतं करा. त्यांनी सांगितलेल्या, सुचवलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. त्यांना योग्य अभिप्राय कळवा. अगदी रोखठोक न बोलता, कधी कधी इतरांचा मान आणि मन दोन्ही जपावं लागतं, तसं करा. तुमच्या जवळच्या माणसांशी आवर्जून संवाद साधा. स्वार्थबुद्धी सोडा.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष