शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Tarot Card: दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, स्वावलंबी होण्याचे धडे देणारा आठवडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:17 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून येत्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन४ ते १० ऑगस्ट===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, शक्ती आणि सामर्थ्य देणारा आहे. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी जे काही साधन लागणार आहे, ते तुमच्या पुढ्यात येणार आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील, इच्छाशक्ती भक्कम राहील. कोणतीही समस्या सोडवायला तुम्हाला योग्य मार्ग सुचतील. जरी तुम्ही एकटे असाल, तरी तुम्हाला आत्मविश्वास वाटेल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे संसाधनांचा योग्य उपयोग. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अतिवापर करू नका. बुद्धीने निर्णय घ्या, भावनांमध्ये अडकू नका. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी लवचिक आणि चपळ रहा. "जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" हे लक्षात ठेवून स्वावलंबी व्हा!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. विनाकारण कोणाबद्दल ही वाईट विचार करु नका. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. वादविवाद, स्पर्धा, मतभेद आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही शांत राहण्याची आहे. उग्रपणे, अविचाराने  निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. लढायला जाऊ नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. "विकास हा नेहमी प्रतिकूल परिस्थितीतूनच होतो" हे लक्षात ठेवून वागा!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष