शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी देणारा आठवडा; निवडा तुमचे टॅरो कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 14:12 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार मनाचा कौल घेऊन तीनांपैकी एक कार्ड निवडले असता साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२४ ते ३० मार्च===============

 नंबर १: 

काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत. जे मिळायला हवे, त्यात काहीतरी कमी राहू शकते. तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. गरजेपुरते काम भागेल. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.

तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. इतरांची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. भांडणात मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा. ध्यान करा, मेडिटेशन करा.

नंबर २: 

काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादं लहान ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. सगळे जण मिळून कुठल्यातरी आनंदात सहभागी होतील.

तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. एखादा गरजेचा खर्च करुन हवं असलेलं काहीतरी घेऊ शकता.

नंबर ३: 

काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. नवीन संधी उपलब्ध होण्याची चांगली शक्यता आहे. कामामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संथ पण आश्वासक अशी वाटचाल होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात,आरोग्यात,कामात स्थैर्य लाभेल.

तुम्ही काय करावे? या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या संधीचे सोने करुन घ्या. मुंगी होऊन साखर खाऊन घ्या. आर्थिक गुंतवणूक विश्वासार्ह ठिकाणी करु शकता. पाय जमिनीवर ठेवा. इतरांना सन्मान द्या, स्वतः थोडा कमीपणा घेतला तर चांगले होईल. काळजी सोडून लहान गोष्टींमध्ये आनंद माना.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष