अनेकदा साधकाच्या मनात एक प्रश्न येतो की, "माझ्यावर माझ्या सद्गुरूंची कृपा आहे का? हे मी कसे ओळखावे?" सद्गुरुकृपा ही केवळ भौतिक सुखात नसते, तर ती तुमच्या आंतरिक ओढीत असते. आपल्यावर सद्गुरुकृपा आहे हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे 'उपासनेतील सातत्य'.
सद्गुरुकृपेचे मुख्य लक्षण: अखंड उपासना
सद्गुरूंनी सांगितलेली उपासना (नामस्मरण, ध्यान किंवा सेवा) जर आपल्याकडून नित्यनियमाने आणि आनंदाने होत असेल, तर समजावे की आपल्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा आहे. गुरुकृपा असल्याशिवाय उपासनेत गोडी निर्माण होत नाही आणि ती नियमितपणे घडत नाही. जेव्हा गुरूंची कृपा होते, तेव्हाच सर्व अडथळे पार करून साधक साधनेत स्थिर होतो.
उपासनेतील ४ मुख्य अडथळे
गुरुकृपेच्या अभावामुळे किंवा प्रारब्धामुळे उपासनेत अनेक अडथळे येतात, ज्यांना 'विक्षेप' म्हटले जाते. हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. शारीरिक व्याधी: शरीराला एखादा आजार होणे आणि त्या वेदनेमुळे उपासनेत मन न लागणे किंवा उपासना सुटणे, हा पहिला अडथळा आहे. २. निद्रा (झोप): उपासनेला बसल्यावर अति प्रमाणात झोप येणे किंवा आळसामुळे वेळ निघून जाणे, हा दुसरा मोठा विक्षेप आहे. ३. आळस: शरीरात आणि मनात आळस भरून राहणे, ज्यामुळे "आज नको, उद्या करू" अशी वृत्ती निर्माण होते आणि उपासनेत खंड पडतो. ४. कुसंगती किंवा नको ती व्यक्ती: अनेकदा आपण उपासनेला बसणार इतक्यात नेमकी नको ती व्यक्ती समोर येते किंवा असे काही काम निघते की उपासनेत व्यत्यय येतो.
सर्वात घातक विक्षेप: 'उपासनेचा अहंकार'
उपासना सुरू झाल्यावर साधकाला सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे अहंकाराचा. "मी इतकी साधना करतो," "मी इतका वेळ जप करतो," हा भाव मनात येणे म्हणजे प्रगती थांबणे होय. हा अहंकार टाळण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत:
सद्गुरूंना प्रार्थना: रोज चरणी प्रार्थना करावी की, "हे सद्गुरुराया, ही उपासना माझी नाही, तर तुम्हीच माझ्याकडून करवून घेत आहात."
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
आत्मपरीक्षण: दिवसभराच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारावा— "आज माझ्याकडून कुणाचे अंतःकरण तर दुखावले गेले नाही ना?" कारण जिथे प्रेम आणि संवेदनशीलता असते, तिथेच गुरुतत्व वास करते.
Web Summary : Guru's grace is recognized through consistent, joyful devotion. Obstacles like illness, sleep, laziness, and distractions hinder practice. Avoid ego by acknowledging Guru's role and practicing empathy, ensuring spiritual progress.
Web Summary : गुरु की कृपा निरंतर, आनंदमय भक्ति से पहचानी जाती है। बीमारी, नींद, आलस्य और ध्यान भंग जैसी बाधाएँ अभ्यास में बाधा डालती हैं। गुरु की भूमिका को स्वीकार करके और सहानुभूति का अभ्यास करके अहंकार से बचें, आध्यात्मिक प्रगति सुनिश्चित करें।