Som Pradosh Vrat November 2025: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चातुर्मासाची सांगता झाली. यानंतर आता कार्तिक महिन्याची सांगता होत आहे. अनेकार्थाने कार्तिक महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक अमावास्येच्या आधी प्रदोष व्रत येत आहे. प्रदोष हे व्रत महादेव शिवशंकर यांना समर्पित असून, सोमवारी हे व्रत आल्याने या व्रताचे तसेच दिवसाचे महत्त्व वाढल्याचे म्हटले जात आहे. सोम प्रदोष व्रत कसे कराल? महत्त्व, मान्यता आणि महात्म्य जाणून घेऊया...
सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सोम प्रदोष आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष आहे. प्रदोष दिनी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
‘या’ अत्यंत प्रभावी शिव मंत्रांचा यथाशक्ती जप करावा ॥ Som Pradosh Vrat Shiv Mantra ॥
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. ‘ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।’ हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥’ या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र म्हणजेच ‘ॐ नमः शिवाय’ याचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
सोम प्रदोष व्रतात कसे कराल शिवपूजन? ॥ Som Pradosh Vrat Puja Vidhi ॥
शक्य असेल तर सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
चंद्र मंत्र ठरतील उपयुक्त ॥ Som Pradosh Vrat Chandra Mantra ॥
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥, हा नवग्रह मंत्रातील चंद्राचा मंत्र आहे. याशिवाय, ॥ ॐ सों सोमाय नम:॥, ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥ हे चंद्राचे प्रभावी मंत्र मानले जातात. ॥ ॐ पद्मद्वाजय विद्महे हेमा रूपाय धीमहि तन्नो चंद्र: प्रचोदयात् ॥, हा चंद्राचा गायत्री मंत्र आहे. चंद्र ग्रह हा सर्वांत वेगाने गोचर करणारा मानला जातो. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी चंद्र देवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्यात. तसेच चंद्र देवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. चंद्र देवाचा गायत्री मंत्र, प्रभावी मंत्र, नवग्रहातील स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा. असे केल्याने चंद्र देवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : Observe Som Pradosh Vrat on November 17, 2025, dedicated to Lord Shiva. Strengthen your Moon by chanting Chandra mantras and offering prayers. Performing Shiv Puja during Pradosh kaal brings auspicious blessings.
Web Summary : 17 नवंबर, 2025 को सोम प्रदोष व्रत करें, जो भगवान शिव को समर्पित है। चंद्र मंत्रों का जाप करके और प्रार्थना करके अपने चंद्रमा को मजबूत करें। प्रदोष काल में शिव पूजा करने से शुभ आशीर्वाद मिलता है।