शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Solar Eclipse 2021: यंदाचं पहिलं सूर्यग्रहण १० जूनला; आपण नियम पाळायचे का? वाचा, शास्त्र काय सांगतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:02 IST

Solar Eclipse 2021: भारतात कुठे दिसणार यंदाचे पहिले सूर्यग्रहण, आपण नियम पाळायचे का, याविषयी जाणून घ्या...

वास्तविक पाहता सूर्यग्रहण ही पूर्णपणे खगोलीय घटना असली, तरी धार्मिकदृष्ट्या याला अधिक महत्त्व आहे. सूर्यग्रहणावेळी काय करावे आणि काय करू नये, याचे वर्णन आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये आढळून येते. शास्त्रांमध्ये सूर्यग्रहणावेळी पाळावयाचे काही नियमही सांगितलेले आढळून येतात. सन २०२१ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. पैकी पहिले सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी लागणार आहे. भारतात कुठे दिसणार हे सूर्यग्रहण, आपण नियम पाळायचे का, याविषयी जाणून घ्या... (know about date time religious rules and significance of surya grahan june 2021)

चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. याला सूर्यग्रहण असे म्हणतात. अमावास्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू नेहमी वक्री चलनाने मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही. 

आजचे काम उद्यावर ढकलणे पडू शकते महाग, कसे ते पहा!

सूर्यग्रहणाला ग्रहस्थिती

यंदाच्या वर्षीचे सूर्यग्रहण वैशाख अमावास्येला लागत असून, या दिवशी शनैश्चर जयंती आहे. वैशाख अमावास्येला भावुका अमावास्या असेही म्हटले जाते. हे सूर्यग्रहण वृषभ राशीत आणि मृगशीर्ष नक्षत्रावर लागेल. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असून, भारताच्या काही भागात दिसेल, असे सांगितले जात आहे. (significance of surya grahan june 2021)

शनी महाराजांचा प्रकोप होत असल्याचे संकेत कसे ओळखावेत? त्यावर कोणते उपाय करता येतील 

भारतात कुठे दिसणार सूर्यग्रहण? 

यंदाचे पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नाही. जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, लडाख या भागांमध्ये अंशतः दिसेल, असे सांगितले जात आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत अनेक धार्मिक मान्यता सांगितल्या जातात. ग्रहण काळात पूजा आणि इतर धार्मिक कामे करू नये. ग्रहण काळात जेवण बनवणे आणि खाणेही अनेकजण टाळतात. भगवंताचे नामस्मरण करावे. सूर्यमंत्र, गायत्री मंत्रांचा जप करावा, असे म्हटले जाते. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादि तसेच अन्य नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. (solar eclipse 2021 rules)

प्रेमाने काम करा आणि कामावर प्रेम करा, तरच नेत्रदीपक यश मिळेल!

कधी लागणार ग्रहण? 

भारतीय पंचांगानुसार, सूर्यग्रहणाचा प्रारंभ दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. ग्रहणाचा मध्य सायंकाळी ०५ वाजून ०३ मिनिटांनी असेल. तर, ग्रहणाचा मोक्ष ६ वाजून ४१ मिनिटांनी होईल. १० जून रोजीचे पहिले सूर्यग्रहण तब्बल ५ तास चालेल, असे सांगितले जात आहे. (solar eclipse 2021 date and time) सूर्यग्रहण उत्तर-पूर्व अमेरिका, आशिया, अटलांटिका महासागराचे उत्तर भाग येथे हे ग्रहण अंशतः दिसेल. तर ग्रीनलँड, उत्तर कॅनडा आणि रशिया येथे हे ग्रहण संपूर्णपणे दिसेल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणIndiaभारत