शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

छोटासा कापूर तुमच्या देवघरालाच नाही, तर वास्तूलाही सर्वतोपरी देईल पावित्र्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:45 IST

वास्तूमधील नकारात्मकतेवर कापराची गोळी अतिशय प्रभावी ठरते व सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी कापूर जाळून आरती करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की कापूरच्या सुगंधाने देवता प्रसन्न होतात आणि सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. कापराच्या वापराशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून पूजेत कापूर नेहमी वापरतात. त्याचबरोबर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही कापराचे बरेच फायदे सांगितले जातात. 

>>जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो. वातावरण प्रसन्न होते.

>>अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाच फोटो किंवा फेंग शुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात. त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल. रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा वाचा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा. आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तू दोष दूर होतील.

>>लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे ६ तुकडे आणि ३६ लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा. देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे.

ग्रहांच्या शांतीसाठीदेखील आपण कापूर वापरू शकता. तूपात भिजलेला कापूर दररोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री जाळावा. 

>>कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत.

>>जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे, त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल.

>>जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी. याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. 

>>जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कपूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा. असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता.

>>जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी. यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल.

>>वैवाहिक जीवनात अडचणीअसतील, तर बेडरूम मध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात. त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल.

>>दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा. मग त्यास घराभोवती फिरवा. असे केल्याने घरात सुख-शांती कायम राहते. 

दिसायला छोटीशी गोष्ट पण आहे ना मोठी फायदेशीर? 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र