शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: स्वामींची दैवी कृपा, दिला आदेश अन् महाराजांचे अलौकिक कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:34 IST

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: अशक्यही ही शक्य करणारे स्वामी महाराज आणि आम्ही गेलो ऐसे मानू नका, असे अखंड आश्वासन देणारे गजानन महाराज यांच्यात अनेक साम्ये आढळून येतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराजांवर ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा होती. स्वामींचे गजानन महाराजांना दैवी मार्गदर्शन लाभले होते. स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच गजानन महाराजांनी अलौकिक कार्य करत भक्तांचे कल्याण केले, असे सांगितले जाते. 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्णवतार मानले जाते. स्वामींचे कोट्यवधी भक्तगण आहेत. स्वामींची शिष्यपरंपराही मोठी थोर आहे. याच शिष्यपरंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येतील, असे शेगावीचे गजानन महाराज आहेत. स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्ये आढळतात, असे सांगितले जाते. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन आल्यामुळे स्वामी महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, जप-मंत्र पठण अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते, असे म्हणतात. बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते.

स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते, असे सांगितले जाते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते, असे अनेकजण म्हणतात. 

स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांची भेट

गजानन महाराज  शेगावला येण्यापूर्वी कुठे होते? ते कुठून आणि कसे आले? या संबंधीचे वर्णन दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात नाही. परंतु, तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते. तिथे त्यांनी आपले बालपण घालविले. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली. सिद्धपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली, असे सांगितले जाते. 

स्वामींनी आदेश दिला की, विदर्भात जा, शेगाव येथे प्रकट हो

अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले की, अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा. पुजारी गहिवरला आणि त्याने वरती पहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता. 

गजानन महाराजांचे भक्तांना कालातीत आश्वासन

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नही जिंदा है, असे स्वामी समर्थ महाराजांनी भाविकांना आश्वस्त केले होते. अगदी त्याचप्रमाणे अवतार सांगता करताना गजानन महाराज म्हणाले की, मी गेलो ऐसे मानू नका । भक्तित अंतर करू नका । कदा मजलागी विसरु नका । मी आहे येथेच ॥ दु:ख न करावे यत्किंचित । आम्ही आहोत येथेच । तुम्हा सांभाळण्यापरी सत्य । तुमचा विसर पडणे नसे ॥ यावरून स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना आपण कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून येते, असे म्हटले जाते. आजही लाखो भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात. नतमस्तक होतात. ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथांचे नित्यनेमाने पारायण केले जाते. प्रकटदिनानिमित्ताने महाराजांचे मनोभावे स्मरण करूया आणि म्हणूया...

।। श्री गजानन जय गजानन।।

।। गण गण गणात बोते ।।

।। श्री स्वामी समर्थ ।।

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरshree swami samarthश्री स्वामी समर्थshree datta guruदत्तगुरुShegaonशेगावspiritualअध्यात्मिक