शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:19 IST

Shravan Vrat 2021: गणरायची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तसेच दुर्वा, पत्री या निमित्ताने निसर्गाशी जवळीक व्हावी म्हणून हे व्रत आहे!

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात, एक विनायकी आणि दुसरी संकष्टी. उद्या श्रावण मासातील विनायकी चतुर्थी आहे. या चतुर्थीला दुर्वागणपती व्रत सांगितले आहे. नावावरून या व्रताच्या विधीचा अंदाज आला असेल. हे व्रत कसे करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया.

या व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक आहे. म्हणजेच ती तिथी माध्यान्ह पूर्ण झाल्यानंतर संपणारी असली पाहिजे. व्रतकत्र्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या सुवर्णाच्या मूर्तीची स्थापना करावी. तिला लाल वस्त्र वाहून षोडशोपचारे पूजा करावी. 

गणेश चतुर्थीला वाहतात तशी पत्री, फुले वाहावीत. आरती करावी आणि आरतीनंतर 'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन, व्रत संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन' अशी प्रार्थना करावी. या पूजेत दूर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून पत्रीबरोबर दूर्वा अर्पण कराव्यात. 

व्रतकर्त्याने  एकभुक्त राहावे म्हणजेच एकवेळ जेवावे. हे व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावण शुक्ल चतुर्थीला या व्रताचा प्रारंभ करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या वेळेस अठरा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. सहा मोदक देवाला, सहा मोदक पुरोहितांना आणि सहा मोदक व्रतकर्त्याने  खावेत असा नियम आहे. गणपतीला सहा दूर्वा आणि सहा नमस्कार घालून व्रत पूर्ण करावे. 

सद्यस्थितीत सोन्याचा गणपती कोणाकडे असणे तसे दुर्मिळच, म्हणून देवघरातील आपल्या रोजच्या गणपतीला फुले वाहून, नैवेद्य दाखवून हे व्रत पूर्ण करावे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल