शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Vrat 2021 : आज वरदलक्ष्मीला दाखवा कर्नाटकी पद्धतीच्या हयग्रीवाचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:13 IST

Shravan Vrat 2021: महाराष्ट्रात देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात तसाच दक्षिणेत हयग्रीवाचा नैवेद्य दाखवतात. पुरणाच्याच जातकुळीतला हा नैवेद्य जरूर करून पहा.

महाराष्ट्रात श्रावणात जसे जिवतीपूजन केले जाते, तसे दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात आपल्याकडे देखील वरद लक्ष्मीची पूजा केली जाते. वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात.

या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्‍यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. 

या दिवशी देवीची पूजा करून वरद लक्ष्मीची कथा वाचावी आणि देवीला नैवेद्यात पुरणावरणाचा नैवेद्य दाखवावा. आजच्या दिवशी दक्षिणेत हयग्रीवाचा नैवेद्य दाखवतला जातो. हे खास कर्नाटकी पक्वान्न आहे. घोड्याचे मुख असलेले हयग्रीव स्वामी म्हणजे विष्णूचा अवतार मानतात.त्यांचा आवडता नैवेद्य हयग्रीव!

हयग्रीव करण्याची पद्धत - एक वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून तिप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजायला हवी पण मोडायला नको. जास्तीचे पाणी काढून एक वाटी गूळ घालून पुन्हा गॅसवर ठेवावी. थोडीशी घोटून घ्यावी. वेलचीपूड, खवलेले ओले खोबरे घालावे. तूपात बेदाणे आणि काजू तळून घालावे.या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि दक्षिणेकडील पदार्थाची ओळख मिळण्यासाठी चिमूटभर भीमसेनी कापूर टाकावा आणि एक दणदणीत वाफ काढावी. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न