शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

दुसरा श्रावणी शुक्रवार: जिवतीची पूजा कशी करावी? आईने मुलांसाठी करायचे व्रत; पाहा, महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 12:48 IST

Shravan Shukrawar Jara Jivantika Vrat Jivati Puja 2024: श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा-जिवंतिका व्रत म्हणजे जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची पूजा करण्याचे महत्त्व, महात्म्य, कहाणी आणि आरती जाणून घ्या...

Shravan Shukrawar Jara Jivantika Vrat Jivati Puja 2024: श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा-जिवंतिका व्रत म्हणजेच जिवतीची पूजा केली जाते. आईने मुलांसाठी करावयाचे हे व्रत असल्याचे सांगितले जाते. श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी? जाणून घेऊया...

श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जिवतीचे चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात. हळद कुंकू वाहून दूध, साखर व फुटाणे प्रसाद म्हणून देतात. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात. एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात. मानवी देहाला अन्नमय, मनोमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक, शिशू, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत. जीवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतिके आहेत. (Jivati Puja Vidhi)

हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर

जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण करावे. मुले परगावी असतील तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या आणि ‘हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर’, अशी प्रार्थना केली जाते. जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. श्रावणातील सर्व शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. त्या दिवशी देवीची ओटी भरावी. (Jivati Puja Vrat Katha Kahani)

जिवतीची कहाणी

जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली, अशी एक कथा पुराणात आढळून येते. (Jivati Puja Aarti)

जिवतीची आरती

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।

पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।

सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास