शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:46 IST

Shravan Shaniwar Nrusinha Pujan 2025: श्रावणातील शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनासह काही ठिकाणी नृसिंह पूजन केले जाते. जाणून घ्या...

Shravan Shaniwar Nrusinha Pujan 2025: २५ जुलै २०२५ पासून चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात हजारो घरांमध्ये जिवतीचा कागद लावून श्रावणातील व्रतांचे आचरण केले जाते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शिवाच्या पूजनासाठी श्रावण सर्वोत्तम मानला गेला असला, तरी प्रत्येक दिवशी येणाऱ्या व्रताचे महात्म्य वेगळे आणि विशेष आहे. यंदा २०२५ मधील श्रावणात पाच शनिवार असून, पहिला श्रावणी शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी आहे. या दिवशी अश्वत्थमारुती पूजन केले जाते. काही ठिकाणी श्रावण शनिवारी नृसिंह पूजन करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया...

जिवतीच्या कागदावर पहिला फोटो भगवान नृसिंह यांचा असतो. प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचे पूजन केले जाते. उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात, अशी मान्यता आहे. तसेच नृसिंह अवतार खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित ‘होळी’ जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजादेखील सामुदायिक पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. 

प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण

श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. चित्र काढणे शक्य नसेल, तर प्रतिमा वापरावी. चित्र काढल्यास त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे, असे म्हटले जाते. 

श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन व्रत

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.

यंदा २०२५ मध्ये ५ श्रावणी शनिवार

- पहिला श्रावणी शनिवार: २६ जुलै २०२५

- दुसरा श्रावणी शनिवार: ०२ ऑगस्ट २०२५

- तिसरा श्रावणी शनिवार: ०९ ऑगस्ट २०२५ (श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन)

- चौथा श्रावणी शनिवार: १६ ऑगस्ट २०२५ (गोपाळकाला)

- पाचवा श्रावणी शनिवार: २३ ऑगस्ट २०२५ (श्रावण अमावास्या)

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास