Shravan Shani Amavasya 2025: श्रावण महिन्याची सांगता शनिवारी होत आहे. शनिवारी अमावस्या आहे. या दिवशी पोळा सण साजरा केला जातो. तसेच श्रावण अमावास्या पिठोरी अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. शेवटच्या श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनही केले जाणार आहे. शनिवार या दिवसावर शनि ग्रहाचा अंमल असतो. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शनिचा प्रतिकूल प्रभाव किंवा शनिदोष असेल, तर तो कसा ओळखावा, त्यासाठी कोणते उपाय करणे लाभदायक ठरू शकते, ते जाणून घेऊया...
शनि महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती खूप वेदनादायी ठरू शकते. अशा परिस्थितीत शनि ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय केल्यास थोडा फरक पडतो, असे म्हटले जाते. तसेच ज्यांची साडेसाती सुरू आहे किंवा ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशांनीही हे उपाय करणे उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते.
आताच्या घडीला कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे?
विद्यमान स्थितीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह देव मीन राशीत विराजमान आहे. मीन राशी स्वामी गुरू आहे. आताच्या घडीला शनि मीन राशीत वक्री असून, नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे. शनि मीन राशीत जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे.
शनिदोष किंवा प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा?
- क्षमतेपेक्षा अधिक काम करूनही कामाचे श्रेय मिळत नाही.
- सतत आर्थिक नुकसान होते किंवा काम बिघडते.
- खूप मेहनत घेऊनही एखाद्या कामात अपयश येते.
- कोणताही खोटा आरोप होणे
- एखादी महाग वस्तू हरवणे किंवा चोरी करणे.
शनिदोष, साडेसाती, प्रतिकूल प्रभाव दूर करण्यासाठी काय करावे?
शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
-रोज हनुमान चालीसा म्हणा.
-निःस्वार्थ मनाने गरीब माणसाला नेहमी मदत करा.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.