शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Budh Brihaspati Vrat 2022: पहिला श्रावणी बुधवार: ‘असे’ करा ‘बुध बृहस्पती व्रत’; मिळवा धनसंपत्ती, बुद्धिमत्ता अन् विद्याधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 05:05 IST

Shravan Budh Brihaspati Vrat Vidhi in Marathi: घरच्या घरी सोप्या, सुलभ पद्धतीने बुध-बृहस्पतीचे व्रताचरण करता येऊ शकते. व्रताचे महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या...

चातुर्मासातील व्रत-वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य राणूबाई पूजन यांप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. सन २०२२ मध्ये पहिला बुधवार ०३ ऑगस्ट रोजी आहे. बुध-बृहस्पती पूजन कसे करावे? याची व्रतकथा काय? जाणून घेऊया... (Shravan Budh Brihaspati Vrat Vidhi in Marathi)

महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यांमध्ये २९ जुलै २०२२ पासून श्रावण सुरू आहे. यामध्ये ०३ ऑगस्ट, १० ऑगस्ट, १७ ऑगस्ट व २४ ऑगस्ट रोजी बुधवार, तर ०४ ऑगस्ट, ११ ऑगस्ट, १८ ऑगस्ट व २५ ऑगस्ट रोजी गुरुवार येत आहे. या दिवशी बुध-बृहस्पती व्रताचरण, पूजन केले जाऊ शकते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला देवघरात चिकटवल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदावर बुध-बृहस्पती दर्शवण्यात आलेल्या असतात. (budh brihaspati vrat puja 2022)

बुध-बृहस्पती व्रताचरण कसे करावे?

बुध-बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. दररोज घरातील देवतांची जशी पूजा केली जाते, तशीच साधी पूजा करावी. शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिकटवला जातो, त्यात बुध-बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल, त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे. (budh brihaspati vrat puja vidhi)

बुध-बृहस्पती व्रतकथा

या व्रताची एक कथा पुराणांमध्ये सांगण्यात आली आहे. एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी सहा सुना, आम्ही कामात आहोत त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत, असे सांगून त्यांना घालवून देत असत. काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले. परिणामी बघता बघता ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले. त्यांच्यापैकी सर्वांत लहान सुनेने त्या मामा-भाच्यांची योग्यता जाणली होती. तिने या मामा-भाच्यांची सर्व कुटुंबीयांच्यावतीने क्षमा मागितली. पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, म्हणून उपाय विचारला. त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. याच व्रतकाळात परराज्यात गेलेल्या तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशीच्या हत्तीने अचानक फुलमाला घातली. त्यामुळे त्या राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले. काही काळानंतर या सात सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत हिंडत या नव्या राज्यात आले. धाकट्याने आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले. मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले. धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते. (budh brihaspati vrat katha in marathi)

धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मन:शांतीसाठी हे व्रत करावेसे वाटते, त्यांनी ते जरूर करावे. शक्य असल्यास आपल्या गुरुंचा आठव ठेवून त्यांना गुरुदक्षिणा द्यावी आणि मुलांच्या हातून त्यांच्या गुरुंना भेटवस्तू, फुल किंवा मनोभावे वंदन करण्यास सांगावे. त्यामुळे मुलांनाही या प्रथेची जाणीव होईल व परंपरेत सातत्य टिकून राहील. हा दिवस एकप्रकारे शिक्षक दिन म्हणून साजरा करता येईल.  

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल