शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Shravan 2021: श्रावण मासातील व्रते इतर मासातील व्रतांपेक्षा वेगळी आणि प्रभावी का? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:45 IST

Shravan 2021: इतर महिन्यातील व्रत वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणे, वारानुसार योजलेली असतात. 

आजच्या पिढीला इंग्रजी बारा महिन्यांची नावे माहित आहेत, परंतु मराठी बारा महिने कोणते असे विचारले असता ते बुचकळ्यात पडतात. त्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय करून द्यायचा असेल, तर आपल्याला सण-उत्सवांच्या मदतीने बारा महिन्यांची ओळख करून देता येईल व त्यातही 'मनभावन हा श्रावण' का आहे, ते पुढील माहितीद्वारे पटवून देता येईल. 

श्रावण मास येताच सृष्टीतील बदल आपल्याला जाणवू लागतात. बालकवींनी `श्रावणमासी हर्षमानसी' या कवितेत केलेल्या उल्लेखाप्रमाणे क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरूनी ऊन पडे!असा हा ऊन पावसाचा खेळ श्रावणात रंगतो. श्रावणसरींनी, व्रत वैकल्यांनी, सण-उत्सवांनी हा महिना चिंब भिजलेला असतो, म्हणून त्याला मराठी महिन्यांचा राजा म्हटले जाते. 

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून याला श्रावण या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्याच्या दृष्टीने चातुर्मासातीलच नव्हे तर बारा महिन्यातील महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. त्याचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणे, वारानुसार योजलेली असतात. 

दर श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी एकभुक्त उपास केला जातो. तसेच शिवाला शिवामूठ वाहिली जाते. मंगळवारी नूतन विवाह झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा आणि जागरण करतात. बुधवारी बुधपूजन तर गुरुवारी बृहस्पतिपूजन करतात. शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे स्त्रियांसाठी खास व्रत आहे. या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक रांधून सवाष्णींना जेवू घालतात. शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवू घालतात. तसेच मारुतीला किंवा शनिला तेल वाहून नारळ वाढवतात. रविवारी सूर्यपूजा करून खीरीचा नैवेद्य दाखवतात. 

श्रावणात मंदिरांमध्ये तसेच ठिकठिकाणी कथा, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन केले जाते. शुभमुहूर्त पाहून भागवत सप्ताह आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने लोक भगवद्कार्य करणाऱ्या कथेकरीला शिधा, दक्षिणा देतात. 

याबरोबर श्रावणात अनेक मोठे सणही येतात. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णजन्म, गोपाळकाला, पिठोरी अमावस्या, बैलपोळा इ. वैविध्याने युक्त असलेल्या सण समारंभातून आनंदाचा वर्षाव होतो. वर्षा ऋतूमुळे थबकलेल्या सणांना नागपंचमीपासून पुन्हा प्रारंभ होतो. त्यात पावसामुळे निसर्गानेदेखील चहुकडे `हिरवे हिरवे गार गालिचे' अंथरले असतात. निसर्गाचा सृजनसोहळा मानवी मनालाही उभारी देतो. म्हणून श्रावण सर्व महिन्यांचा राजा ठरतो.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल