शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Shravan 2021 : आजपासून संपूर्ण श्रावणमास 'हा' मंत्र म्हणा आणि पावन व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:00 IST

Shravan 2021 : या प्रसन्न काळात शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसले तरी आपल्याला त्याचे नित्य स्मरण करून पावन होता येईल.

आजपासून श्रावण मास सुरू होत आहे. हा महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण या काळात भगवान महाविष्णू विश्रांती घेत असताना जगाचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शंकर यांच्यावर असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या महिन्यात शिवपुजेला प्राधान्य दिले जाते. हा महिना भगवान शंकराचा आवडता महिना आहे. कारण तो व्रत वैकल्यांनी सजलेला आहे. अशा या प्रसन्न काळात शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसले तरी आपल्याला त्याचे नित्य स्मरण करून पावन होता येईल. त्यासाठी पुढे दिलेला श्लोक रोज सकाळ संध्याकाळ म्हणावा. 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

Shravan Somvar 2021 vrat : शिवामूठ वाहण्याने मुख्य दोन लाभ काय होतात ते जाणून घ्या!

सोरटी सोमनाथ, श्रीशैल, महाकालेश्वर, ओंकारमांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औढ्या नागनाथ, काशी विश्वनाथ, त्रंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळ येथील पशुपतीनाथ हेही यातील आहे. परंतु हिमालयातील केदार आणि नेपाळ येथील पशुपतीनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग धरले जाते. 

ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज, ज्योती म्हणजे ज्ञान, ज्योती म्हणजे प्रेरणा आणि ज्योती म्हणजे चेतना. ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशात लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आमची संस्कृती एक आहे अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ही ज्योतिर्लिंगे. एकराष्ट्रीयत्वाची ही एक खूण आहे. मानवाला प्रकाश, चेतना, तेज, ज्ञान, प्रेरणा देणारी ही ज्योतिर्लिंगे आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन पहावीत. तूर्तास श्रावण मासानिमित्त त्याचे स्मरण करून पावन व्हावे! 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल