शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Shravan 2021 : वर्षभरातून केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडते 'या' मंदिराचे द्वार, अद्भुत मूर्तीदर्शनाने होते सर्पदोषाचे निवारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 18:14 IST

Shravan 2021: आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात.

उज्जयिनीचे महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्रिपुरासुर माजला होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळवला. म्हणून या ठिकाणाचे नाव उज्जयिनी आहे. तिथे शिव शंकरांची आपल्या परिवारासह शेषावर विराजमान झालेली अद्भुत मूर्ती आहे. अशा मूर्तीचे दर्शन अन्यत्र  कोठेही घडत नाही. हे मंदिर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे . परंतु या मंदिराच्या तीन भागांपैकी सर्वात वरचा भाग तो म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिराचा भाग हा केवळ नागपंचमीच्या दिवशी २४ तास खुला असतो आणि त्याच दिवशी या सुंदर मूर्तीचे दर्शन घेता येते. 

महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागले आहे. गर्भगृहात अर्थात तळ घरात महाकालेश्वर विराजित आहेत. मधल्या भागात ओंकारेश्वर विराजित आहेत आणि वरच्या भागात नाग चंद्रेश्वर विराजित आहेत. या मंदिरात माता सतीचे कोपर गळून पडले होते म्हणून हे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते व तिथे देवीच्या कोपराची पूजा केली जाते. गर्भ गृह आणि मध्य गृह दर्शनासाठी नेहमी खुले असतात, परंतु नाग चंद्रेश्वराचा भाग दर्शनासाठी केवळ नागपंचमीलाच खुला केला जातो. 

नाग चंद्रेश्वर मंदिरात असलेली मूर्ती अकराव्या शतकातली आहे असे म्हटले जाते. ही मूर्ती नेपाळवरून आणली असल्याचे पुरावे आहेत. आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात. ही प्रतिमा केवळ अद्भुत आहे. या मंदिरात असलेल्या नागमूर्तींच्या दर्शनाने सर्व प्रकारचे सर्पदोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात तिथे दर्शनासाठी गर्दी करतात. 

कोव्हीड मुळे सलग दोन वर्षे भाविकांना दर्शन घेता आले नाही, परंतु प्रथेमध्ये आजतागायत खंड पडलेला नाही. नागपंचमीच्या दिवशी तिथे त्रिकाल पूजा केली जाते. पहिली पूजा नागपंचमीची तिथी सुरु होते तेव्हा, दुसरी सूर्योदयाला आणि तिसरी सूर्यास्ताला केली जाते. आज नागपंचमीच्या निमित्ताने आणि श्रावण मासाच्या निमित्ताने आपणही नाग चंद्रेश्वराचे आणि महाकालेश्वर तसेच ओंकारेश्वराचे चित्रमय दर्शन घेऊन पावन होऊया. हर हर महादेव! 

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीShravan Specialश्रावण स्पेशल