परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी  वयाचे बंधन असावे का? जाणून घ्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून live चर्चासत्रात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 06:38 PM2021-02-26T18:38:10+5:302021-02-26T18:38:59+5:30

डॉ. राजीमवाले यांच्या ज्ञानाचा आवाका पाहता या चर्चासत्रातून आपल्यालाही ज्ञानात भर पडेल, हे निश्चित! तर ऐकायला विसरू नका, 'परमार्थ प्राप्तीचा मार्ग'

Should there be an age limit for walking on the path of Parmartha? Know In a live discussion from Dr. Rajimwale! | परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी  वयाचे बंधन असावे का? जाणून घ्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून live चर्चासत्रात!

परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी  वयाचे बंधन असावे का? जाणून घ्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून live चर्चासत्रात!

Next

परमार्थाची गोडी बालवयात लागली, तरच आयुष्यभर टिकते. म्हणून आपल्याकडे मुलांना श्लोक, स्तोत्र, हरिपाठ, सुभाषितं, आर्या इ धार्मिक गोष्टींचा सराव बालपणात करवून घेतला जातो. त्यामुळे जिभेला आणि मनाला सुयोग्य वळण मिळते. म्हणून परमार्थाबाबत सर्व वयोगटातील लोकांनी आग्रही असले पाहिजे. हाच विषय घेऊन 'परमार्थ प्राप्तीचा मार्ग' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले. २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर स्वप्नाली पाटील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.

डॉ. राजीमवाले यांच्या ज्ञानाचा आवाका पाहता या चर्चासत्रातून आपल्यालाही ज्ञानात भर पडेल, हे निश्चित! तर ऐकायला विसरू नका... 
विषय : परमार्थ प्राप्तीचा मार्ग 
दि. २७ फेब्रुवारी २०२१, रात्री ८ वाजता

Web Title: Should there be an age limit for walking on the path of Parmartha? Know In a live discussion from Dr. Rajimwale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.