शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

Shani Jayanti 2025: शनि व मारुती कृपाशिर्वादासाठी कोणती उपासना फलदायी ठरेल? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:37 IST

Shani Jayanti 2025: आज शनी प्रदोष आहे आणि सोमवारी २६ मे रोजी शनी जयंती, त्यानिमित्त शनी-मारुती उपासना कशी करावी ते जाणून घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

लहान असताना आपण एक खेळ खेळत असू आठवतंय? डोंगराला आग लागली पळा पळा पळा.... त्या शनी देवांची अशीच अवस्था करून ठेवली आहे ह्या पृथ्वीवर . शनीची इतकी बदनामी करून ठेवली आहे, की साडेसाती, पनवती, दशा, आली की नुसती पळापळ! दिसेल त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याच्या डोक्यावर तेल घालायचे, ह्या ज्योतिष कडून त्या ज्योतिषाकडे धाव घ्यायची, नवस बोलायचे, काय चाललाय काय हे?  शनी काय खाणार आहे की काय आपल्याला? 

शनी साडेसाती, पनवती आली, की मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या ऐवजी लोक ज्योतिषाच्या घराच्या पायऱ्या झिजवतात. नुसती पळापळ चालली असते. कारण आपण केलेल्या सर्व चुकांची छबी आपल्याच चेहऱ्यावर उमटते. मन भयभीत होते आणि आपलेच मन आपल्याला खाते. आपण गेल्या ३० वर्षात काय दुष्कर्म केले ते सगळे आठवते आणि मग उडते ती घाबरगुंडी आणि रात्रीची झोप. आता आपली खैर नाही, हे बरोबर त्यांना माहित असते. त्यांनी गेल्या ३० वर्षात अगणित चुका केलेल्या आहेत. चुकीची कर्म केलेली आहेत, त्यांनाच ही भीती वाटते. जे सरळमार्गी उपासना करणारे आणि कुणालाही न फसवता अहंकार विरहित जीवन जगणारे असतात, ते न घाबरता शनीला शरण जातात, त्यांना शनी देव का त्रास देतील? उलट त्यांना ते बक्षीसच देतील नाही का?

मारुती काय आणि शनी काय आपल्याला कुणीही नीट समजलेच नाहीत, किंबहुना त्यांना आपण समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केलाच नाही. असाल तिथे नाम घेणे हीच साधना आहे, खरं सांगा, करतो का आपण ती ? जरा वेळ मिळाला की मोबाईल हातात आणि मग insta , फेसबुक सगळे दिमतीला हजर. उपासक जन्माला यावे लागतात असे म्हटले जाते. देवासाठी वेळ नाही आपल्याला. देवाशी व्यवहार करणारे साधक त्याला कसे आवडतील? मुलाचे लग्न व्हावे म्हणून हनुमान चालीसा, कुलदेवीची ओटी ..पुढे काय ? लग्न झाले हुश्श, सुटलो एकदाचे, आता कसला मारुती नि कसली देवी? ऐकवायला वाचायला आवडणार नाही पण हे कटू सत्य आहे. 

आपण केलेली उपासना नामस्मरण जे काही करू ते कधीही वाया जात नाही .आपली आधीची काही चुकीची कर्मे  असतील तर ती धुण्यासाठी उपयोगी पडते . उपासनेचे मर्मच मुळी संयम आहे. शनीच्या कृपेला मी पात्र कसा ठरेन असे विचार आपल्याला उपासनेची महाद्वारे उघडून देतील. मुळात जे काही करू ते मनापासून. देवता आपण केलेली उपासना, मन नाही बघत तर आपला हेतू पाहते . हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर ती फलित होणारच. चांगल्या हेतूने मागितलेल्या कुठल्याही गोष्टीच्या पूर्ततेसाठी परमेश्वर अनंत हाताने मागे उभा राहतोच राहतो. 

अखंड विश्वात एका धुळीच्या कणाचेएवढे आपले अस्तित्त्व, तरी गमजा किती! मोठमोठ्या वल्गना , मी असा मी तसा . सतत मनात द्वेष , मत्सर, निर्भत्सना, राग, दुसऱ्याचे वाईट करण्याची वृत्ती. पण हे सर्व परतून आपल्याच कडे परत येणार आणि म्हणूनच मग घर अशांत कारण मनात अशांतता . सतत दुसऱ्यावर जळण्याची , कुणाचेही चांगले न बघण्याची वृत्ती मग आपले तरी कसे चांगले होणार?

शनी आपल्या आत आहे . शनी आणि गुरूच्या राशी बघा, आयुष्याच्या संध्याकाळी भेटतात आपल्याला , कारण वयाच्या पन्नाशी नंतर  मनाने, वृत्तीने जरा परिपक्व व्हा हेच त्यांना सुचवायचे असते. पण आपण बालीशच राहणार . आपल्याला ह्या अध्यात्माची खोली कधी ना उमजणार ना कधी ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार म्हणूनच म्हंटले आहे ना मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण. सारखे त्या शनीवर आग पाखडून कसे चालेल ? एकदा का साडेसाती संपली की  शनी ला विसरून पुन्हा आपण वाटेल तसे वागायला मोकळे, असेच चित्र आणि व्यवहार असतो आपला. कलियुगात देवाचे अस्तित्व जाणवण्यासाठी मनापासून प्रयत्नशील राहणे, सतत नाम घेणे हा एकच पर्याय आहे आणि तो सहज सोपा आहे. पुन्हा करोना किंवा त्याचा भाऊ आला तर काय करणार आपण? सतत भीतीच्या छायेत वावरणार का आपण? सततचे दडपण आपले शरीर पोखरून अनेक रोगांना आश्रय देतंय, हे लक्षात येतंय का आपल्याला? नामाने विचारांची शुद्धता होईल, भीती दडपण , पडणारी वेडी वाकडी स्वप्ने बंद होतील . कुणाच्या अश्रुना कारणीभूत ठरू नका, कुणाची निंदा नालस्ती , अत्यंत खालच्या दर्ज्याचे राजकारण नको , सुडाची बुद्धी नको , कुणाला हसू नका चेष्टा नको , पुढील वळणावर आपल्याही आयुष्यात काय घडणार माहित नाही आपल्याला.  हनुमान चालीसा २१ दिवस रोज २१ वेळा म्हणा आणि अनुभव घ्या. कुठलाही आजार असो त्याचे मुळासकट उच्चाटन होईल., आत्मविश्वास द्विगुणीत होईल. प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि जगण्यास बळ मिळेल. श्रीरामाचा जप करा त्याना आणि मारुती रायाला समोर बसवा आणि मनापासून शरणागती पत्करून हनुमान चालीसा आनंदाने म्हणा . जीवन बदलून जाईल, ह्यात शंका नाही. शनीच्या एका कृपादृष्टीसाठी आयुष्य त्याच्या चरणावर समर्पित करा ... ओम शं शनैश्चराय नमः 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधी