शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Shakambhari Purnima 2025: आई तुळजाभवानीचे रूप असलेली देवी बनशंकरी हिच्या मंदिराची घेऊया माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:26 IST

Shakambhari Purnima 2025: आज शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस, त्यानिमित्त भरपूर भाज्या देणाऱ्या या देवीचे मंदिर कुठे आणि कसे आहे ते पाहू. 

>> योगेश काटे, नांदेड 

आज पौष पौर्णिमा अर्थात् शाकंभरी पौर्णिमा (Shakambhari Purnima 2025). आज शाकंभरी देवीची पूजा करून या नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते. या देवीचे वर्णन केले आहे- शाकंभरी नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।। स्वतःला नीलवर्णी असूनही सर्व भाविकांना भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या देणारी ही देवी आहे. 

ही शाकंभरी देवी म्हणजेच देवी बनशंकरी! ही देवी म्हणजे  शक्तिपीठ आई तुळजाभवानीचे स्वरूप.  महाराष्ट्राजवळील कर्नाटकात  भगवतीचे हे मंदीर   महाराष्ट्र व कर्नाटक  सीमावर्ती भागातील अनेक  कुटुंबांची ही कुलस्वामिनी म्हणजे बदामी येथील बनशंकरी  आहे. पुराणांनुसार एकदा शंभर वर्षांचा दुष्काळ पडला, तेव्हा आई भगवतीने आपल्या शरीरातून शाकभाज्या निर्माण केल्या. (शाकान् बिभर्ति इति). त्याचप्रमाणे पाताळातून हरिद्रातीर्थाचे पाणी आणून लोकांच्या जीविताचे रक्षण केले. म्हणजेच भाविकांची भूक, तहान भागवले. 

कर्नाटकच्या बागलकोट  जिल्ह्यातील बादामी शहराजवळच्या चोलचगुडू (या भागाचे प्राचीन नाव तिलकवन असे होते.) येथे असलेल्या शाकंभरीच्या मूळ मंदिराची बांधणी सुमारे तेराशे वर्षांपूर्वी झाली असावी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील निर्मल शहराचा राजा पद्मराज ह्याने हे मंदिर बांधले, असा पुराणग्रंथात उल्लेख आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हरिद्रातीर्थ तलाव आहे. मूर्ती अष्टभुजा असून ती सिंहारूढ असल्याचे दिसते. सिंहाच्या गळ्यात रुंडमाळा आहेत. दुर्गेचे एक नाव कांतारवासिनी आहे. बनशंकरी ह्या नावाशी त्याचे साधर्म्य दिसते.

ह्या देवीच्या नवरात्राचा उत्सव पौष शुद्ध सप्तमीपासून (काही ठिकाणी अष्टमीपासून) सुरू होऊन, तो पौर्णिमेला संपतो. हे शाकंभरी नवरात्र होय.

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

टॅग्स :Navratriनवरात्रीTempleमंदिर