शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Shakambhari Navratri 2025: ७ ते १३ जानेवारी रंगणार शाकंभरी नवरात्रोत्सव; जाणून घ्या कुळाचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:15 IST

Shakambhari Navratri 2025: पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो, पण कसा? त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते, परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट आणि ती कशी साजरी करतात, याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या 'धर्मबोथ' या ग्रंथातून जाणून घेऊया. यंदा ७ ते १३ जानेवारी शाकंभरी नवरात्रीचा (Shakambhari Navratri 2025) उत्सव असणार आहे. सुरुवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. 

पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. ह्याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच आहेत. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव 'बनशंकरी' असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोटा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.

शाकंभरी नवरात्रीची कथा 

देवीभागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार, एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधाशांती करणारी देवी, म्हणून तिची प्रार्थना करूया.

या देवि सर्व भुतेषु क्षुधारूपेण संस्थिता,नम: तस्यै, नम: तस्यै, नम: तस्यै नमो नम:

महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले, म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव मिळाले अशी कथा आहे. 

शाकंभरी देवीचा नैवेद्य 

ज्यांची ही कुलदेवता आहे, ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात.

अलिकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञदेखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही!

शाकंभरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प 

शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट 'व्रत' म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे. चला तर, 'जय माता दी' म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया.

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधी