शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त करा देवीची विशेष उपासना; भाग-७

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:23 IST

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त देवीचे स्तोत्र आणि त्याचा भावार्थ जाणून घेऊया.

>>रवींद्र गाडगीळ

कनकल सत्कल सिंधु जलैरनू सिंचती योषण रंग भुवं, भजति स कीं न शचिकूच कुंभ तटी परिरंभ सुखानू भवम, तव चरणम शरणं करवाणि सुवाणी पथम मम देही शिवम, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१९||

सुवर्णवर्णाच्या घड्यांनी सागराच्या पाण्याने ज्या योगिनीच्या बरोबर तुझ्या प्रांगणात रंग खेळत असतेस, त्या इंद्राणीचा संग लाभ सुखानुभव मी कल्पनेनेच अनुभवतो, हे पार्वती देवी, तुझ्या चरणाशी जो रत होतो, जेथे सर्व देवता कायम आपले मस्तक ठेऊ इच्छितात, टी तू आमचे कल्याण कर. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

तव विमलेन्दूकलं वदनेंदुमलम सकलम यन्ननूकुलयते, कीमु पुरहूत पुरीन्दू मुखी सुमुखी भी रसौ विमुखी क्रियमम तू मतं शिवनाम धने भवती कृपया किमू न क्रियते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||२०||

तुझ्या उत्साही आनंदी चंद्रमुखी चेहर्‍याकडे बघितले, की इंद्रपुरीच्या सुंदर सुंदर अप्सरांकडेही बघावेसे  वाटणार नाही,अशी तू त्रिपुरसुंदरी.  त्यामुळे मला पक्की खात्री आहे की जो भक्त शिवाचे नामस्मरण सदा करत असेल, त्यावर तू शिवप्रिया कृपा का करणार नाहीस? म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

अयी मयी दीनदयालू तया कृपयेव त्वया भवितव्यमुमे, अयी जगतो जननीती यथाsसी मयाsसि तथाsनुमतासी रमे | यदूचीतमत्र भवत्पुरगम कुरु शांभवी देवी दयां कुरू मे, जय जय हे महिषसुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||२१||

हे उमा, तू दयाळूपणे आमच्यासारख्या दीनांवर कृपावंत हो, कारण तूच आमची पोषणकर्ती अन्नपूर्णा माता आहेस, म्हणूनच आम्ही तुझी विविध रुपात ध्यानधारणा करीत असतो, आमचा हा भवताप नष्ट कर, अर्थात तू तुला जे आमच्या बाबतीत उचित वाटेल तेच कर, आणि तू ते करशीलच. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.

म्हणून हे जगदंबे शाकंभरी देवी, आम्हावर कृपावंत हो. आम्हाला सन्मार्गात ठेव. आमच्या हातून सत्कार्यच होऊ दे. देव, देश, धर्म यासाठीच आमचे आयुष्याचे सार्थक होऊ दे. जयोस्तूsते. पुढील श्लोक उद्या. 

टॅग्स :Navratriनवरात्री