शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

यशाच्या मार्गातला दगड बाजूला तर करून पहा, कदाचित तुम्हालाही सुवर्ण मोहरांची थैली सापडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:00 IST

यशाच्या मार्गात येणारे भले मोठे दगड हे अडचण न समजता आव्हान म्हणून स्वीकारा, जेणेकरून भविष्य सोन्यासारखे उजळून निघेल.

एक राजा होता. त्याला आपल्या प्रजेची परीक्षा घ्यावीशी वाटली. एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून त्यांची भूमिका ते कसे पार पाडतात, हे त्याला जाणून घ्यायचे होते. यासाठी राजाने सेवकांना सांगून एक युक्ती केली. 

एका रात्री राजाने सैनिकांना सांगून राज्याच्या रोजच्या वर्दळीच्या जागी भला मोठा दगड टाकायला लावला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून राजा गुप्त वेषात गावकऱ्यांवर नजर ठेवून होता. 

सकाळ झाली, तशी लोकांची वर्दळ सुरू झाली. कामानिमित्ताने लोक त्या मुख्य रस्त्याने ये-जा करू लागले. तिथून जात असताना कोणी दगडाकडे दुर्लक्ष करत बाजून निघून गेले, तर कोणी राज्यकारभाराला दोष देत चिडचिड करत जाऊ लागले. मात्र कोणीही दगड बाजूला घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. 

एका दगडामुळे तिथल्या दळणवळणाच्या मार्गावर अडचण येत असल्याचे पाहून बाजारात आलेला एक शेतकरी दगडाजवळ गेला. हातातली पिशवी धोतराला खोचून त्याने पूर्ण ताकदिनीशी दगड हलवायला सुरुवात केली. आजूबाजूने जाणारे लोक त्याच्याकडे बघत होते, परंतु मदत करायला कोणीही सरसावले नाही. राजा ते पाहत होता. शेतकऱ्याने प्रयत्नांची शर्थ करून दगड बाजूला केला आणि पाहतो तर काय, तिथे मोहरांची थैली पडली होती. त्याने ती कुतुहलाने पाहिली, तेव्हा राजा तिथे येऊन म्हणाला 'कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ही सुवर्ण मोहरांची थैली तुम्हाला भेट देत आहोत.'

या छोट्याशा गोष्टीवरून मोठा बोध घ्यायला हवा, तो म्हणजे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, परंतु कोणी अडचणींकडे दुर्लक्ष करत जगत राहतो, कोणी अडचणींसाठी दुसऱ्यांना दोष देतो, तर कोणी अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्या माणसालाच भविष्यरूपी सुवर्ण मोहोरांची थैली मिळते. त्यामुळे यशाच्या मार्गात येणारे भले मोठे दगड हे अडचण न समजता आव्हान म्हणून स्वीकारा, जेणेकरून भविष्य सोन्यासारखे उजळून निघेल.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी