सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:00 AM2021-07-15T08:00:00+5:302021-07-15T08:00:04+5:30

त्याचबरोबर सूर्याची बारा नवे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा.

See the benefits and scientific reasons for sacrificing the sun ... | सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते पहा...

सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते पहा...

googlenewsNext

धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणे पाप आहे. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, 'लवकर निजे लवकर उठे, त्यासी आयुरारोग्य लाभे!' ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला. सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे, असा संस्कार हिंदू धर्म शास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. याउलट लवकर उठून सूर्य दर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात, की संध्यासमयी सूर्याला दिलेले अर्घ्य जल वज्र बनून असुरांचा नाश करते. विज्ञानाच्या दृष्टीने असून कोणते, तर पुढीलप्रमाणे-

मनुष्याला त्रास देणारे असूर आहेत, टायफाईड, निमोनिया इ रोग ज्यांना नष्ट करण्याची दिव्यशक्ती सूर्यकिरणांमध्ये असते. एन्थ्रेक्सचे किटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत ते सूर्य किरणाच्या एक दीड तासातच मरतात. उकळत्या पाण्याने मरत नाहीत. परंतु सूर्याच्या प्रभातकालीन साधकांवर सूर्यकिरणे सरळ पडतात. 

अर्घ्य कसे देतात -
तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशाप्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास ताम्हन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर ताम्हनातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे. 

अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र -

एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!
अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर!

अर्थ : हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे. 

त्याचबरोबर सूर्याची बारा नवे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील. 

शास्त्रानुसार प्रात:काळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिले पाहिजे. पाण्याचा गडू छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावे आणि गडूचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही. असे केल्याने डोळ्यात मोतिबिंदू होत नाही असे म्हणतात. 

Web Title: See the benefits and scientific reasons for sacrificing the sun ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.