शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Sankashti Chaturthi March 2021: फाल्गुन संकष्ट चतुर्थी: पाहा, चंद्रोदय वेळ आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:24 IST

Sankashti Chaturthi March 2021: फाल्गुन वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थीचा व्रतपूजन विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... 

भारतीय संस्कृतीत, व्रत-वैकल्यांना विशेष महत्त्व आहे. कोट्यवधी भाविक कोणती ना कोणती व्रत-वैकल्ये करत असतात. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मार्च महिन्यात दुसऱ्यांदा येणारी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी मराठी वर्षातील शेवटची म्हणजेच फाल्गुन वद्य चतुर्थी आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. फाल्गुन वद्य चतुर्थी (sankashti chaturthi march 2021) म्हणजेच संकष्ट चतुर्थीचा व्रतपूजन विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... 

फाल्गुन संकष्ट चतुर्थी: बुधवार, ३१ मार्च २०२१

फाल्गुन वद्य चतुर्थी प्रारंभ: बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ०४ मिनिटे.

फाल्गुन वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ०१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता. 

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. 

मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी; पाहा, शुभ मुहूर्त आणि महती 

कसे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत (sankashti chaturthi vrat puja vidhi)

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपतीच्या मूर्तीसमोर नैवेद्य आणि पाण्याचा पेला ठेवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाचे फुलं आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (sankashti chaturthi city wise chandrodaya timing)

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिट
वर्धारात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ३१ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे

 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी