शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी; पाहा, व्रतपूजनाचा विधी, चंद्रोदय वेळा व मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 20:40 IST

Sankashti Chaturthi June 2021: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचे व्रताचरण, पूजनाचा विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीत व्रतोपासना, सण-उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात काही ना काही व्रत, सण, उत्सव येत असतात. मात्र, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचे व्रताचरण, पूजनाचा विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (jyeshta sankashti chaturthi 2021 date)

ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी: २७ जून २०२१ 

ज्येष्ठ वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, २७ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटे.

ज्येष्ठ वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, २८ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, २७ जून २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणतात, असे सांगितले जाते.   (sankashti chaturthi 2021 vrat puja vidhi in marathi)

महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर... 

असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (sankashti chaturthi 2021 city wise chandrodaya timing)

संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचे एवढे महत्त्व का, जाणून घ्या

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून ०१ मिनिट
ठाणेरात्रौ १० वाजता
पुणेरात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ५३ मिनिट
वर्धारात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ५२ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी