शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सन २०२१ मधील पहिली संकष्ट चतुर्थी : 'असे' करा व्रतपूजन; चंद्रोदय वेळ जाणून घ्या

By देवेश फडके | Updated: January 2, 2021 14:35 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संकष्ट चतुर्थी येणे उत्तम योग मानला जात आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन, विविध राज्यांतील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...

ठळक मुद्देसन २०२१ मधील पहिली संकष्ट चतुर्थी मुंबईसह प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घ्यामार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वेगळे महत्त्व

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संकष्ट चतुर्थी येणे हा अद्भूत योग जुळून असून, गणपती उपासकांसाठी ही एक पर्वणी मानली जात आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि व्रत-वैकल्यांमध्ये गणपती पूजन, आराधना, उपासना, नामस्मरण यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती बाप्पाच्या उपासनेत संकष्ट चतुर्थी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. सन २०२१ मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन, विविध शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...

संकष्ट चतुर्थी : शनिवार, ०२ जानेवारी २०२१

मार्गशीर्ष वद्य चतुर्थी प्रारंभ : शनिवार, ०२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०९ वाजून १० मिनिटे.

मार्गशीर्ष वद्य चतुर्थी समाप्ती : रविवार, ०३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०८ वाजून २२ मिनिटे.

संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि पूजनविधी

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. शूचिर्भूत होऊन एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. यानंतर गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखावावा. दिवसभर उपास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे. 

मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. तसेच मार्गशीर्ष महिना लक्ष्मी देवीचा महिना म्हणूनही ओळखला जातो. 'मासांना मार्गशीर्षोऽहम्' या वचनाने भगवद्गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. यामुळे मार्गशीर्ष मासाच्या वद्य पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीलाही वेगळे महत्त्व प्राप्त होते. गणपती पूजनासह लक्ष्मी देवीचे नामस्मरण करणे शुभ आणि लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिट
वर्धारात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता
परभणीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीNew Yearनववर्ष