शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला आणलेली गजमूर्ती दाखवेल कमाल; वास्तू होईल मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:09 IST

Sankashti Chaturthi 2025: गज अर्थात हत्ती हे वैभवाचे प्रतीक, लक्ष्मीचे वाहन आणि गजाननाची ओळख; म्हणून वास्तु शास्त्रात गजमूर्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे!

आपले वर्तमान आणि भविष्य कसे असणार आहे, हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असते. फेंगशुईमध्ये याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. फेंगशुईनुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बळ तर मिळतेच पण आरोग्यही चांगले राहते. १६ फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2025) आहे. या मुहूर्तावर घरी गजमूर्ती आणण्याचे लाभ जाणून घेऊ. 

श्रीगणेशाची कृपा राहते

शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. पूर्वी राजे महराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत. आताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळ्याची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल. 

आर्थिक संकटातून सुटका 

जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल, तर नवीन वर्षात हत्तीच्या दोन मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो.

फेंगशुईमध्ये हत्ती ठेवण्याचे नियम आहेत

लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दु:खाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणे चांगले मानले जाते. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका. 

मूर्तींचे मुख या दिशेला ठेवावे

तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करत असाल, तर ते एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर घरात कलह आणि भांडणाचे वातावरण निर्माण होते. म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभे केले पाहिजे. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीVastu shastraवास्तुशास्त्र