शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

Sankashti Chaturthi 2025: आर्थिक अडचणी पाठ सोडत नाहीत? संकष्टीपासून सुरू करा 'हा'प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:25 IST

Sankashti Chaturthi 2025: १६ फेब्रुवारी रोजी संकष्टी आहे, या मुहूर्तावर सर्व प्रकारची विघ्ने दूर करणार्‍या बाप्पाला शरण जा आणि दिलेला उपाय करा!

संकष्ट चतुर्थीला आपण भक्तिभावे उपास आणि उपासना करतो. बाप्पाने आपल्या हाकेला धावून यावे आणि प्रापंचिक अडचणीतून आपल्याला सोडवावे असे कोणाही भक्ताला वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी उपासनेचे बळ वापरायला हवे. नुसती इच्छा असून भागत नाही, पदरात पुण्यसंचयही असला पाहिजे हा पुण्यसंचय कसा होतो? तर सत्कर्म, भक्तिभाव आणि उपासनेच्या त्रिवेणी संगमाने!  गणपती हा जसा बुद्धिदाता आहे तसाच तो सिद्धीदातादेखील आहे. आर्थिक अडचणी सोडवून करिअरमधील प्रगतीसाठी संकष्टीपासून अर्थात १६ फेब्रुवारी २०२५ (Sankashti Chaturthi 2025) सुरू करा दिलेला उपाय!

संसार म्हटला की अडचणी येणार, त्यातही त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील तर सगळे काही अवघड होऊन बसते. ऋण काढून सण साजरे करता येत नाहीत आणि पैशांचे सोंगदेखील आणता येत नाही. गाठीशी पैसा नसेल तर कोणी किंमतही देत नाही. अशा कात्रीत आपण सापडू नये, यासाठी ज्योतिष शास्त्राने 'ऋणमुक्ती स्तोत्रा'चे पठण करा असे सुचवले आहे. मात्र हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही, तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे. अनन्यभावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होउदे आणि कर्जमुक्ती होउदे अशी विनंती करावी. नित्य सरावासाठी ऋणमुक्ती स्तोत्र पुढील प्रमाणे -

अस्य श्रीऋणविमोचनमहागणपतिस्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि:, ऋणविमोचन महागणपतिर्देवता, अनुष्टुप छन्द:, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थे जपे विनियोग:।

ऊँ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ।।1।।महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम । एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये ।।2।।एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम । महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये ।।3।।शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगंधानुलेपनम । सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये ।।4।।रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगंधानुलेपनम । रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।5।।कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनम । कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ।।6।।पीताम्बरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनम । पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।7।सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम । सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।8।।एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशय: ।।9।।सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत ।।10।।

टीप : - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिष