शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:33 IST

Sankashti Chaturthi June 2025 Moonrise Time : संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते.

Sankashti Chaturthi June 2025: हिंदू कालगणनेनुसार सध्या तिसरा महिना अर्थात ज्येष्ठ महिना सुरू आहे. या मराठी वर्षातील आज तिसरी संकष्ट चतुर्थी. श्री गणेश यांना बुद्धीची देवता म्हटले जाते. गणेशाची उपासना म्हणजे साक्षात बुद्धीची उपासना, असेही म्हटले जाते. अनेक भक्त प्रत्येक चतुर्थीला गणेशाचे व्रत करत असतात, उपवास करत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची अर्थात गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. त्यांच्या पूजेसाठी चतुर्थीचे व्रत हे अत्यंत शूभ माणले जाते. तर, ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ, व्रतपूजनाचा सोपा विधी आणि काही मान्यतांबद्दल जाणून घेऊया...

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाची उपासना करत असता. त्यांचे पूजन करत असतात.

ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी (कृष्ण पक्ष) : शनिवार, १४ जून २०२५- ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शनिवार, १४ जून २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ४६ मिनिटे.- ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी समाप्ती: रविवार, १५ जून २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ५१ मिनिटे.- पूजा करण्याची शुभ वेळ सायंकाळी ०६ वाजून ४० मिनिटांपासून ते ०७ वाजून ०५ मिनिटांपर्यंत असणार आहे. - ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी चंद्रोदय - रात्री १०.०२ वाजता 

संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते.

असे करा संकष्ट चतुर्थी व्रत पूजन -संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते.  रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीganpatiगणपती 2024Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण