शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:32 IST

Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj: अनेक महिलांच्या मनात असलेली ही शंका, त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर तुमच्याही शंकेचं समाधान करू शकेल!

Period During Pilgrimage: पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. नव्हे तर ती निसर्गाने स्त्रियांना दिलेले वरदान आहे असे प्रेमानंद महाराज म्हणतात. याबाबत विशेषण देताना त्यांनी सांगितले, 'मासिक धर्म निंदनीय नाही तर वंदनीय आहे!' स्त्रियांना येणारा मासिक धर्म केवळ त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी नसून प्रकृती निर्मितीसुद्धा त्या करू शकतात. त्यामुळे मासिक धर्म हा पवित्रच मानला पाहिजे. मात्र, तीर्थक्षेत्री गेल्यावर पाळी आली तर? एका महिला भाविकेने विचारलेल्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय संयमित उत्तर दिले. 

भारतात राहणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मनात घोळणारा हा प्रश्न आहे. कारण कुठेही सहलीचे बेत आखताना स्त्रियांना मासिक पाळीची तारीख लक्षात घ्यावी लागते. सर्वांचेच मासिक चक्र सुरळीत असते असे नाही, तर अनेक महिलांना एक दोन महिने पाळीच येत नाही. त्यामुळे त्यांना तारखेचे गणित बसवता येत नाही. अशा वेळी तीर्थक्षेत्री जाताना त्यांना विचार करावा लागतो. काही जणी तर धार्मिक स्थळी गेल्यावर पाळी येऊ नये म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यासुद्धा घेतात. तसे करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. मात्र देवाचा कोप होईल या भीतीने त्या ही कृती करतात. वास्तविक पाहता यावर उत्तर आहे कामाख्या देवी, जिथे देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर वर्षभरात तिथे देवीचा मासिक धर्म म्हणून चार दिवस मंदिर बंदही ठेवले जाते. अपवित्र म्हणून नाही तर देवीला विश्रांती म्हणून! तर मग अपवित्र होण्याचा प्रश्न कुठून आला? तरीदेखील पापभिरू स्वभावामुळे अनेक जणी या गोंधळात अडकतात आणि देवाच्या पायथ्यापाशी जाऊन परत येतात. 

यावर प्रेमानंद माहाराजांनी दिलेले उत्तर निश्चितच चिंतन करण्यास प्रवृत्त करणारे ठरेल. ते म्हणाले, '' एखाद्या तिर्थीक्षेत्री गेल्यावर मासिक पाळी आली तर देवदर्शन घ्यावे की नाही हा संभ्रम मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग वारंवार येत नाहीत. मोठ्या परिश्रमाने शारीरिक, मानसिक, आर्थिक गणित बसवून आपण तिथे पोहोचतो. मात्र तिथे गेल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला तर अशा वेळी दर्शन टाळणे म्हणजे तोंडाशी आलेला घास दूर करण्यासारखे आहे. ज्याच्या दर्शनासाठी आलो आहे, त्याचे दुरून दर्शन घ्यावे. गर्भगृहात जाऊ नये. सभागृहातून दर्शन घ्यावे आणि बाहेर यावे. आपली अवस्था देवाला सांगावी, भक्तिभावाने नमस्कार करावा. असे करणे चुकीचे नाही. कारण तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आयुष्यात पुन्हा कधी येईल हे माहीत नसते. अशा वेळी स्वतःशी आणि परमात्म्याशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले!

पहा प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ -

टॅग्स :Healthआरोग्यMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यTravel Tipsट्रॅव्हल टिप्सspiritualअध्यात्मिक