काल २७ ऑगस्ट रोजी गणेश उत्सवाची(Ganesh Festival 2025) सुरुवात झाली आणि आज ऋषिपंचमी(Rishi Panchami 2025). त्यानिमित्त ऋषीमुनींच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ.
देवी देवतांकडे कधीही पहा, त्या प्रसन्न दिसतात. त्यांना पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. म्हणून आपण देवदर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो. देवाचे नखशिखांत रूप न्याहाळतो. ते न्याहळत असताना देवाचे वस्त्र आपले लक्ष वेधून घेते.
Rishi Panchami 2025: आज ऋषिपंचमी आणि कलावती आई तसेच मच्छिंद्रनाथ यांचीही जयंती; पाहूया त्यांचे कार्य
सरस्वतीचे शुभ्र वस्त्र, राम-सीतेची वल्कले, विष्णूंचे पितांबर, दत्तात्रेयांचे मृगाजिन, महादेवाचे व्याघ्राजिन, जगदंबेची खणाची साडी, गणरायाचे सोवळे, पांडुरंगाचे-बालाजीचे शुभ्र धोतर आपल्या लक्षात राहते. बाकीचे वस्त्रप्रकार आपणही वापरतो. पैकी मृगाजिन, व्याघ्राजिन हे वस्त्रप्रकार मात्र दत्त, महादेव वगळता साधू-संत, ऋषीमुनी वापरत असल्याचे आपण पाहिले आहे. यामागे कारण काय ते जाणून घेऊ.
व्याघ्रजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-व्याघ्रजिन म्हणजे वाघाच्या कातड्याचे वस्त्र. व्याघ्राजिनावर बसण्याने मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धी यासारखे विकार होत नाहीत. झालेलेही नष्ट होतात. तसेच व्याघ्राजिनाजवळ सर्प, विंचू, किडेकाटे विषारी जीवजंतु येत नाहीत. त्यामुळे त्यांचे भय रानावनात निर्जन प्रदेशातही व्याघ्राजिनावर बसून ध्यानधारणा करणाऱ्यांना राहत नाही. प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात.
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
मृगाजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-मृगाजिनावर बसल्यानेही मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धि यासारखे रोग नष्ट होतात. मृग हा निसर्गत: शाकाहारी सत्ववृत्तीचा प्राणी आहे. म्हणूनच तपोवनातील तपस्वी आपल्या आश्रमात मृग पाळून त्यांचा सहवास स्वीकारत असत. हरणाजिनावर बसणाराचा कामविकार शमन पावतो. इतकेच काय, पण त्यावर सतत बसल्यास नपुंसकता येते. म्हणून, तपस्वी, वानप्रस्थी, संन्यासी त्यांचा सतत उपयोग करत असत. परंतु ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी तसे नपुंसक होऊ नये, म्हणून त्यांनी मृगाजिनावर दर्भासन घ्यावे, असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. त्यायोगे कामशमन होते परंतु नपुंसकता येत नाही.
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
म्हणून देव, ऋषि मुनी मृगाजिन, व्याघ्राजिन परिधान करत किंवा त्याचे आसन बनवून त्यावर आसनस्थ होत तपश्चर्या करत असत.