शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratha Sapatmi 2026: रथसप्तमीआधी चुलीचे (गॅसचे) पूजन का करतात? जाणून घ्या त्यामागील रंजक शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:37 IST

Ratha Saptami 2026: रथसप्तमीच्या आदल्या दिवशी गॅस किंवा चुलीची पूजा का केली जाते? जाणून घ्या या परंपरेमागील शास्त्रीय आणि धार्मिक कारण.

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विज्ञानाची आणि निसर्ग पूजनाची जोड दिलेली असते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा मोठा दिवस. पण या दिवसाच्या अगदी आदल्या दिवशी घराघरात गॅस, चूल किंवा शेगडीचे पूजन करण्याची एक अनोखी परंपरा आहे. या परंपरेला 'चुलीचे पूजन' असेही म्हटले जाते. यंदा रविवार २५ जानेवारी रोजी रथसप्तमी(Ratha Sapatmi 2026) आहे, त्या निमित्ताने ही माहिती जरूर वाचा आणि तिचा उपयोग करा.  

रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला पूजन का?

रथसप्तमीच्या दिवशी सूर्य नारायण आपल्या रथात बसून मार्गक्रमण करतात, असे मानले जाते. या दिवशी सूर्याला 'खीर' किंवा 'दूध-तांदळाचा' नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. हा नैवेद्य तयार करण्यासाठी ज्या अग्नीचा वापर केला जातो, त्या अग्नी देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वसंध्येला शेगडी किंवा चुलीचे पूजन केले जाते.

यामागील धार्मिक आणि शास्त्रीय कारण:

१. अग्नी देवतेची आराधना: अन्न शिजवण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. अग्नी हा ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याचा अंशच अग्नीच्या रूपात आपल्या स्वयंपाकघरात असतो, अशी भावना यामागे आहे. २. शुद्धता आणि पावित्र्य: रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला दिला जाणारा नैवेद्य अत्यंत सात्त्विक असावा लागतो. चूल स्वच्छ करून तिचे पूजन केल्यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण मंगलमय आणि शुद्ध होते. ३. निसर्ग कृतज्ञता: आपल्या संस्कृतीत जल, वायू, अग्नी या पंचमहाभूतांना देव मानले आहे. अन्नाशिवाय जीवन अशक्य आहे आणि ते अन्न शिजवून देणाऱ्या साधनाची पूजा करणे म्हणजे निसर्गाप्रती आदर व्यक्त करणे होय.

पूजन कसे करावे?

रथसप्तमीच्या आदल्या दिवशी सायंकाळी गॅसची शेगडी किंवा चूल व्यवस्थित स्वच्छ करावी.

त्यावर हळद-कुंकू वाहावे, गंध लावावा.

फुले अर्पण करून अगरबत्ती ओवाळावी.

काही ठिकाणी चुलीभोवती रांगोळी काढली जाते आणि तिला नमस्कार करून दुसऱ्या दिवशीच्या नैवेद्यासाठी प्रार्थना केली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratha Saptami 2026: Why worship stove before? The science explained.

Web Summary : Before Ratha Saptami, stoves are worshipped to show gratitude to the fire god, essential for preparing the Sun God's offering. This tradition purifies the kitchen and honors nature.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणkitchen tipsकिचन टिप्स