शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

Rath Saptami 2025: रथसप्तमीपूर्वी वास्तु शास्त्रानुसार बदल करा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:02 IST

Rath Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, तत्पूर्वी लेखात सुचवलेले बदल केले असता वास्तुमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील.

१४ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेला मकरोत्सव यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमीच्या (Rath Saptami 2025) मुहूर्तावर पूर्ण होणार आहे. हा काळ संक्रमणाचा तसेच सकारात्मक ऊर्जा देणारा समजला जातो. या काळात केलेले चांगले बदल आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठीच वास्तु शास्त्रात सूर्याशी संबंधित दिलेले बदल जाणून घ्या. 

वास्तू उभारताना पूर्व दिशा पाहिली जाते. जेणेकरून वास्तूमध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश व्यापून राहावा. जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता नांदते. यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार घरातील कोणत्या खोलीची जागा कुठे असावी हे जाणून घ्या!

वास्तुशास्त्राच्या पुढील नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बदल केले, तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला काही काळातच दिसून येईल. घरातील आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीतही बदल घडताना दिसतील. त्यासाठी या किरकोळ बदलांनी सुरुवात करा. 

>> सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे ३-६ हा ब्रह्म मुहूर्त. यावेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजागृह बनवावे.

>> सकाळी ६-९ या वेळेत सूर्य घराच्या पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे त्या दिशेने घरात सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा. त्या दिशेला खिडकी असणे उत्तम, मात्र त्याच्या समोर काही वस्तू ठेवून सूर्यप्रकाशाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. मोकळी हवा, सूर्यप्रकाश घरात खेळू द्या. त्यामुळे आजार पसरवणारे सूक्ष्म जीव नाहीसे होऊन कुटुंब स्वास्थ्य जपले जाईल. 

>> सकाळी ९-१२ पर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. ज्याप्रमाणे पोटाती>> ल अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपण जेवतो, तसे स्वयंपाक बनवतानाही सूर्यप्रकाशाच्या उजेडात बनवलेला स्वयंपाक आरोग्यासाठी पोषक ठरेल आणि तो बनवताना गृहिणीलाही प्रसन्न वाटेल. 

>> दुपारी १२-३ ही आपल्या विश्रांतीची वेळ असते. अशा वेळी सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्यावेळेस सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात, त्यामुळे विश्रांती दरम्यान खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून ती किरणं घरात येण्यापासून आळा घालावा. 

>> अभ्यास व कामाची वेळ दुपारी ३-६ अशी असून त्यावेळेस सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी ही दिशा उत्तम ठरते. 

>> सूर्यास्ताची वेळ न्याहारी किंवा काही जणांसाठी जेवणाची वेळ असते. सूर्यास्ताचा प्रकाश, वेळ थोडी हुरहूर लावणारी असल्याने ती वेळ टाळून किंवा त्याच्या पूर्वी आहार घेणे सोयीचे ठरते. पश्चिम दिशेला तुमच्या घराची खिडकी येत असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मंद संगीत आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता, फक्त पदार्थाचे सेवन टाळा. सूर्यास्तामुळे आजार पसरवणाऱ्या कीटकांचे प्राबल्य वाढते. म्हणून पूर्वी ७ च्या आत रात्रीचे जेवण उरकले जात असे. 

>> झोपेच्या वेळी सूर्य अनुपस्थित असतो, परंतु सकाळ सूर्याच्या किरणांनी होणार असल्यामुळे बेडरूमची दिशा पश्चिमेला असेल तर सूर्यकिरणे थेट बेडरूममध्ये शिरकाव करतील आणि आपली मॉर्निंग आपोआप गुड होईल. 

>> घरातील मौल्यवान वस्तू, पैसे ठेवण्याची जागा अर्थात तिजोरी गुप्त राहावी या हेतूने कपाटाची दिशा उत्तरेला ठेवा. 

वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रMakar Sankrantiमकर संक्रांती