शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 26, 2020 7:00 AM

हनुमंतांनी सीतामाईला हृदयस्थ रामाचे दर्शन घडवले, त्यावर प्रसन्न होऊन सीतामाई आणि रामरायांनी हनुमंताला 'चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला.

ठळक मुद्देहनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत -प्रभू श्रीराम

ज्योत्स्ना गाडगीळ 

प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत आणि समस्त वानरसेना रावणाला पराजित करून अयोध्येत परत आली. तेव्हा, अयोध्यावासीयांनी उत्सव साजरा केला, जल्लोश केला, गुढ्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या आणि आपल्या रघुरायाचे आणि सीतामाईचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. प्रेमाने भारावलेल्या सीतामाईला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटले. तिने आपला मनोदय रामरायासमोर मांडला आणि त्यांनी होकार दिल्यावर एक भेट समारंभ आयोजित केला. समस्त वानरसेना, अयोध्यावासी या समारंभात सहभागी झाले होते. प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेऊन सीतामाई आणि रामरायांनी त्यांना भेटवस्तू देऊ केली. 

या समारंभात हनुमंतदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांचे समारंभात अजिबात लक्ष नव्हते. ते एका झाडावर फळ खात बसले होते. अचानक सीतामाईच्या लक्षात आले, जवळपास सर्वांना भेटवस्तू देऊन झाल्या, मात्र या कार्यात ज्याचा सिंहाचा वाटा होता, त्या हनुमंताला आपण काहीच भेट दिली नाही. सीतामाईने रामरायाला ही बाब सांगितली व हनुमंताला काय भेट द्यावी अशी विचारणा केली. त्यावर रामराय निरुत्तर झाले. ते म्हणाले, `हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. सीतामाईलाही ती बाब पटली. तरीदेखील, सीतामाईला भेटवस्तू देण्याचा मोह आवरला नाही. तिने हनुमंताला बोलावून घेतले. 

आज्ञा मिळताच, पुढच्याच क्षणी हनुमंत समोर हजर. त्यांनी सीतामाई आणि रामरायाला वंदन केले आणि 'काय आज्ञा' अशी विचारणा केली. सीतामाईने थेट मुद्द्याचे बोलून आपल्या गळ्यातला, माहेरहून मिळालेला, अतिशय मौलिक असा नवरत्नांचा हार हनुमंताला भेट म्हणून दिला. `या हाराचे मी काय करणार?' असा विचार येत हनुमंताने रामरायाकडे पाहिले. सीतेचा आग्रह मोडू नकोस, या भेटीचा स्वीकार कर, असे रामरायाने नजरेतूनच सांगितले. हनुमंताने तसे केलेही. 

भेटवस्तू स्वीकारून हनुमंत पुन्हा झाडावर जाऊन बसले. त्यांनी पुनश्च हाराकडे निरखून पाहिले. हारातली रत्ने चमचमत होती. आकर्षक दिसत होती. परंतु, त्या रत्नांमध्ये मारुतीरायाला आपलीच प्रतिमा दिसत होती. कदाचित रत्नाच्या आतमध्ये रामराय असतील, अशा विचाराने हनुमंताने एक एक रत्न दाताने फोडून बघायला सुरुवात केली. सीतामाईने कुतुहलाने कटाक्ष टाकला. तिला वाटले होते, हनुमंत आपण दिलेल्या भेटवस्तूचा स्वीकार करून, सर्वत्र मिरवेल. मात्र, चित्र काही भलतेच होते. 

केवळ नवरत्न फोडल्याचे दु:ख नव्हते. तो हार माहेरून मिळालेला असल्याने, स्वाभाविकच हाराची किंमत चौपट होती. त्याची अशी विल्हेवाट लागत असताना पाहून सीतामाईने थोडं रागात आणि थोडं नाराजीत हनुमंताला प्रश्न विचारला, `हनुमंता भेटवस्तू आवडली नव्हती, तर तसे सांगायचे ना. दुसरे काहीतरी दिले असते. पण तू, हे असे वागलेले मला अजिबात आवडले नाही. 

मातेची क्षमा मागून हनुमंत म्हणाले, `रावणाविरुद्ध लढणे, त्याचा पराभव करणे आणि आपल्या स्वामींच्या कार्याला हातभार लावणे, ही सेवक म्हणून माझी जबाबदारीच होती. ते काही उपकार नव्हेत. म्हणून मी समारंभात असूनही अलिप्त बसून होतो. आपण मला भेटवस्तू देऊ केली. ती खरोखरीच अपूर्व होती. परंतु, ती नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्यात माझे रामराय नाहीत. त्यांच्या शोधार्थ मी प्रत्येक रत्न फोडून माझे नररत्न आढळते का, याचा शोध घेत होतो. 

हेही वाचाः भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

हनुमंताच्या स्पष्टीकरणावर प्रतिप्रश्न करत मातेने विचारले, 'तुला त्या हारात रामराय दिसले नाहीत, म्हणून ती तोडून टाकलीस. मात्र, तू  एवढा रामनाम घेत असतोस, मग तुझ्या हृदयात तरी राम आहे का?'

त्याक्षणी हनुमंताने उठून मातेला वंदन केले, रघुरायाचे स्मरण केले आणि आपली छाती फाडून हृदयस्थ परमेश्वर असलेले रामपंचायतनाचे दर्शन घडवले. ते पाहून सीतामाईला आश्चर्य वाटले आणि कुतुहलही. हनुमंताच्या रामभक्तीची तिला जाणीव झाली. सीतामाई आणि रामरायाने हनुमंताला `चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजतागायत चिरंजीवी हनुमंतांच्या रामभक्तीचे दाखले दिले जातात. त्यांच्या रामभक्तीचा अंश आपल्यातही उतरावा, अशी प्रार्थना करूया आणि म्हणूया,

सीयावर रामचंद्र की जय।पवनसुत हनुमान की जय।बोलो रे भाई, सब संतन की जय।

हेही वाचाः अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या