शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:06 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाला सुरुवात झालेली आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण होऊन वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. परंतु, पहिल्या दिवसांपासून राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची भाविकांची आस आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज सुमारे लाखो भाविक राम मंदिरात येऊन दर्शन घेतात. अत्यंत अल्प काळात देशातील टॉप १० मंदिरात राम मंदिराचा समावेश झाला आहे. केवळ भाविकांच्या संख्येच्या दृष्टीने नाही, तर दान, देणग्यांच्या बाबतीतही राम मंदिराच नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यातच राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचे काम पूर्ण झाले असून, यासह राम मंदिर परिसरातील ७ मंदिरांमध्ये विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली आहे. 

०३ जून ते ०५ जून या दरम्यान या सर्व मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात येणार आहे. या कालावधीत सलग १२ तास विधी केले जाणार आहे. तब्बल १०१ पुजारी १९७५ मंत्रांचे पठण करत हवन करणार आहे. अग्नि देवतेला आहुती दिली जाणार आहे. नवीन भव्य श्री रामजन्मभूमी मंदिराच्या नव्याने बांधलेल्या आठ मंदिरांची प्राणप्रतिष्ठा एकाच वेळी धार्मिक विधींसह केली जात आहे. राम मंदिर परिसराच्या ईशान्येला शिवलिंग, आग्नेय दिशेला श्री गणेश, दक्षिणेच्या मध्यभागी महाबली हनुमान, नैऋत्य दिशेला दृश्यमान देव सूर्य, वायव्येला माँ भगवती आणि उत्तरेच्या मध्यभागी अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती असतील. मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्री राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि नैऋत्य दिशेला शेषावतार मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी केला जाणार आहे, याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने माहिती दिली आहे. यापूर्वी भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

भाविकांना दर्शनासाठी या मंदिरांमध्ये कधी जाता येईल?

ज्येष्ठ शुक्ल अष्टमी म्हणजेच ३ जूनपासून सुरू झालेला प्राणप्रतिष्ठेचा विधी दशमीला म्हणजेच ५ जून रोजी पूजा, नैवेद्य आणि आरतीने पूर्ण होईल. तिन्ही दिवशी पूजा विधी सुरू राहतील. भाविकांसाठी ही मंदिरे कधी उघडायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पहिल्या मजल्यावर असलेल्या श्री राम दरबारात मर्यादित संख्येने लोकांनाच प्रवेश दिला जाईल. कदाचित प्रति तास फक्त ५० भाविकांसाठी परवानगी दिली जाऊ शकते, असा कयास आहे. सध्या ट्रस्टमध्ये याबाबतच्या योजनेवर सविस्तर चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राम मंदिरात धार्मिक विधींचा भाग म्हणून राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा यांचे पठण केले जात आहे. प्राणप्रतिष्ठेचा मुख्य समारंभ ५ जून रोजी होणार आहे. या दिवशी श्री राम, हनुमान, सीता, लक्ष्मण यांच्या राम दरबारातील मूर्तींसह इतर ६ मंदिरांमध्ये देवतांची प्राणप्रतिष्ठा जाणार आहे. पहिल्या प्राण प्रतिष्ठानाच्या वेळी, भगवान श्रीरामांच्या बालस्वरूपाची स्थापना झाली. ५ जून २०२५ रोजी दुसऱ्या प्राणप्रतिष्ठानाच्या वेळी भगवान राम राजा म्हणून स्थापित होतील. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर भगवान श्री रामांचा दरबार असेल. या दरबारात, भगवान श्रीरामांसोबत, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान विराजमान असतील.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशTempleमंदिरtempleमंदिर