शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:35 IST

Chaturmas First Shukra Pradosh Vrat September 2025: शुक्र प्रदोष म्हणजे काय? या व्रतात शिवपूजन कसे करावे? कोणते मंत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या...

Chaturmas First Shukra Pradosh Vrat September 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या सांगतेला आता मोजकेच दिवस उरलेले आहेत. तत्पूर्वी शुक्र प्रदोष व्रत आहे. प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शिवाच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. शुक्र प्रदोष म्हणजे काय? या व्रतात शिवपूजन कसे करावे? कोणते मंत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकतील? जाणून घेऊया...

प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. तसेच या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. शुक्रवारी प्रदोष व्रत आले की, त्याला शुक्र प्रदोष म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्र प्रदोष व्रत आहे. 

प्रदोष काळात शिव आणि पार्वतीचे पूजन

काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.  

शुक्र प्रदोष व्रत शिवपूजन कसे करावे?

प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे.

शुक्र प्रदोष व्रतात महादेवांच्या मंत्रांचा जप रामबाण

प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते.  'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

प्रदोष व्रतात शुक्र ग्रहाशी संबंधित मंत्र जप, उपाय उपयुक्त

शुक्र प्रदोष व्रत शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे शुक्र ग्रहासंदर्भातील दोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होऊ शकतो, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, शुक्र ग्रहाचे काही दोष असतील, तर त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. तसेच हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्। सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥, हा शुक्राचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे. ॥ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:॥, हा शुक्राचा बीज मंत्र असल्याचे सांगितले जाते. ॥ॐ अश्वध्वजाय विद्महे धनुर्हस्ताय धीमहि तन्नः शुक्रः प्रचोदयात्॥, ॥ॐ रजदाभाय विद्महे भृगुसुताय धीमहि तन्नो शुक्र: प्रचोदयात्॥, हे दोन शुक्राचे गायत्री मंत्र आहेत. कुंडलीत शुक्र कमकुवत असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा समावेश असलेले वस्त्र दान करावे. शुक्रवारी विशेष व्रताचरण करावे, असे काही उपाय सांगितले जातात. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधी