शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

प्रबोधिनी एकादशीला विठुरायाकडे एकच मागणे : हेचि दान दे गा देवा...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 25, 2020 10:39 PM

मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी, पांडुरंगाचा आणि भक्तांच्या भेटीचा दिवस. मंदिराचे द्वार उघडले, परंतु अजूनही `देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' अशी परिस्थिती अजून झालेली नाही. म्हणून जिथे आहोत तिथूनच, दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून विठुरायाकडे मागणे मागायचे, 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी,नलगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा,तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी।

या वर्षभरात जी अनोखी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे भक्त-भगवंताची देहाने ताटातूट झाली असेल, परंतु मनाने ताटातूट कधीच झाली नाही आणि होणारही नाही. हा अतूट प्रेमाचा धागा दोहोंना बांधून ठेवणारा आहे. हेच प्रेम तसूभरही कमी होऊ नये, म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवतात, हेच दान आमच्या पदरात टाक, की तुझा विसर आम्हाला कधीच पडणार नाही. मुखाने तुझे गुण गाऊ आणि तुझ्या भजनात दंग होऊन नाचू, तो आनंद सोहळा अनुभवण्यासाठी तुझी आठवण सतत आम्हाला राहू दे. 

हेही वाचा : वैकुंठप्राप्तीसाठी करतात, वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!

शेकडो वर्षांच्या परंपरेचे स्मरण करून हेचि दान देगा देवा म्हटलेच पाहिजे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, 'मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे. हे मागणे सकाम असले, तरी ते निष्कामालाही निष्काम करणारे आहे. निरिच्छेलाही निरिच्छ बनवणारे आहे, असे आगळे वेगळे मागणे संतांनी मागावे आणि आपण केवळ पुनरुच्चारण करावे.'

आठवण कोणाची ठेवावी लागते, तर आपण ज्यांना विसरतो त्यांची! परंतु, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी अशी अवस्था झालेल्या संतांना देवाचा विसर पडणे शक्यच नाही. तरीदेखील तुकाराम महाराज समस्त जनांच्या वतीने हे मागणे मागत आहेत आणि पांडुरंगाने ते दान पदरात टाकावे, अशी विनंतीदेखील करत आहेत. आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात देवाचा विसर पडू नये, तर देवाच्या साक्षीने प्रत्येक काम पार पडावे, हा त्यामागचा हेतू आहे. 

स्वार्थापुरते इतरांचे गुण गाणारे आम्ही पामर, ज्याने सर्वस्व दिले त्याचेच गुण गायला विसरतो. परंतु, संत मात्र 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' म्हणत नामस्मरणात तल्लीन होतात. ती समाधी अवस्था अनुभवायची असेल, तर आवडीने हरीनाम घेतले पाहिजे. 

या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायला नको, म्हणून आम्ही पापभिरू, देखल्या देवा दंडवत करतो. परंतु, जेव्हा हरीनाम गोड वाटू लागेल आणि परमार्थाचा प्रवास सुरू होईल, तेव्हा विषयांची आसक्ती कमी होऊन धन, संपत्ती, मोक्ष अशी कुठलीच अभिलाषा उरणार नाही. आम्ही केवळ सत्संगाचे मागणे मागत राहू. संतसहवासात राहून तुझे स्मरण करत राहू. प्रत्येक काम तुला अर्पण करू, मुखाने चांगलेच बोलू, कानाने चांगलेच ऐकू , मतीने चांगलाच विचार करू. ही सवय एकदा का जडली, तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला, तरी बेहत्तर, आम्ही त्यात सुखच मानू असे तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी!

चला तर मग, आपणही तुकाराम महाराजांप्रमाणे पांडुरंगाकडे मागणे मागुया आणि प्रबोधिनी एकादशीला आपल्या अंतस्थ परमेश्वराला साद घालुया.जय हरी!

हेही वाचा : त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!