शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:39 IST

Prabodhini Ekadashi 2025: यंदा २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशी आहे, या सुमुहूर्तावर सुरु केलेली ही उपासना तुम्हाला चांगले फळ देईल. 

२ नोव्हेंबर रोजी चातुर्मास संपून भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेचा त्याग करणार आहेत. त्यांची विश्रांती पूर्ण होताच त्यांच्या शाळीग्राम रूपाशी तुलसी विवाह लावून दिला जाईल आणि मंगलकार्याला सुरुवात होईल. याबरोबरच आयुष्यात अडलेली कामं, हुकलेले यश, संधी मिळण्यासाठी, आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी देवउठनी एकादशीपासून पुढील विष्णू उपासना सलग २१ दिवस करा. ती उपासना कोणती आणि कशी करावी ते जाणून घेऊ. 

प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार

ही उपासना आहे स्तोत्र पठण करण्याची! व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देव दर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. त्यासाठीच या स्तोत्राची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे-

१) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे.

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावे.  

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या, जसे की, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य!

Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावे. 

५)  इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे. 

७ ) २१ दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. 

Prabodhini Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला सुरू करा नित्य हरिपाठ आणि म्हणा 'हा' बीजमंत्र!

 श्री व्यंकटेश स्तोत्र

व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः।संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण