भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत अर्थात सर्वपित्री अमावास्येपर्यंत(Sarva Pitru Amavasya 2025), पितृपक्षात (Pitru Paksha 2025) पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केले जाते. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी(Pitru Paksha date 2025) असणार आहे. परंतु एकाच पंधरवड्यात दोन ग्रहण असल्याने श्राद्धविधीवर त्याचा परिणाम होणार का? ते दिवस निषिद्ध ठरणार का? ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो. या १५ दिवसांत पितर पृथ्वीवर येतात. म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात. यावर्षी ८ ते २१ सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असेल.
चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2025):
पितृपक्ष सुरु होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला, रविवारी ७ सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध असेल. चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. पौर्णिमा तिथी रात्री ११.३८ मिनिटांनी संपेल, नंतर प्रतिपदा सुरु झाली तरी ती ८ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयारंभ सोमवारपासूनच होईल. दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय ११, १४, १५,१८, २१ यापैकी कोणत्याही दिवशी करावे.
सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025):
यानंतर, २१ सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला(Sarva Pitru Amavasya date 2025) श्राद्धविधी आणि दानधर्म करावे.
सर्वपित्री अमावस्या(Sarva Pitru Amavasya 2025) :
पितृपक्षाचा काळ पितरांच्या आशीर्वाद घेण्याचा मानला जातो. मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्धतिथी माहीत नसते, तरीदेखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते. अशा भाविकांसाठी सर्वपित्री ही तिथी राखीव ठेवली आहे. त्यानुसार रविवार २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्यादिवशी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येतील.