शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2024: श्राद्धतिथी आणि उपास एकाच दिवशी आले तर श्राद्धाचा स्वयंपाक करावा की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:12 IST

PItru Paksha 2024: अनेक जण गुरुवार, एकादशी, शनिवारचे उपास करतात, पण त्याच दिवशी श्राद्धतिथी आली तर पर्याय काय? जाणून घ्या.

काही वेळा योगायोगाने संकष्टी, प्रदोष, एकादशी अशा उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येते. त्यावेळी पितरांना नैवेद्य काय दाखवावा, ही अडचण निर्माण होते. यावर धर्मशास्त्राने दिलेला तोडगा प्रभावी ठरू शकतो. तो कोणता, हे जाणून घेऊ.

उपासाच्या दिवशी पितरांची श्राद्धतिथी आली असता सूर्योदयानंतर सुमारे सात तास ती तिथी असल्यामुळे व्रतदिनाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती तिथी राहणार आहे का, हे पंचांगात किंवा दिनदर्शिकेवर दिलेल्या माहितीत पाहून घ्यावे. जाणकारांना विचारावे. 

पंचांगानुसार उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत नसेल तर प्रश्नच उद्भवत नाही. परंतु उपासाच्या दिवशी श्राद्धतिथी येत असेल व हस्तश्राद्ध करायचे असेल, तर ज्यांचा उपास नाही असे ज्येष्ठ ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रित करावेत. उपास नाही, असे ब्राह्मण उपलब्ध नसतील, तर नातेवाईकांपैकी उपास नसलेल्या व्यक्तीला आणि तीदेखील उपलब्ध नसेल तर गरजू व्यक्तीला श्राद्धाचे अन्न अर्पण करावे आणि पितरांजवळ तशी अडचण व्यक्त करावी.

श्राद्धाचा नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीचा उपास असेल, जसे की संकष्टीचाएकादशीचा, गुरुवारचा उपास असेल, तर अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भोजन न करता श्राद्धाचा नैवेद्य ब्राह्मणाला, गायीला, कावळ्याला आणि कुत्र्याला वाढून स्वत: मात्र ते अन्न केवळ हुंगावे. आणि सायंकाळी उपास सोडते समयी श्राद्धाच्या जेवणाचे अन्न नैवेद्य समजून भक्षण करावे. 

काही संप्रदायानुसार एकादशीचे श्राद्ध दुसऱ्या दिवशी करण्याची प्रथा आहे. परंतु शास्त्रानुसार श्राद्धतिथी ओलांडू नये. श्राद्धाचे जेवण आपण पितरांसाठी करत असतो. म्हणून आपल्या उपासासाठी त्यांना उपाशी ठेवणे किंवा पर्यायी फराळी पदार्थांचा नैवेद्य दाखवणे उचित नाही, तसेच शास्त्राला धरून नाही. 

या गोष्टींची खबरदारी घेता, उपासाचा बाऊ न करता पितरांचे श्राद्ध वेळच्या वेळेस करावे आणि उपास सोडताना तो नैवेद्य आपण ग्रहण करावा, हे सयुक्तिक ठरते.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षfoodअन्नPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३