शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Pitru Paksha 2021 : पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? हे आधुनिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:46 IST

Pitru Paksha 2021: कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला, तेही आपले खाजगी वाहन म्हणून! कावळ्याचा भाव वधारला.

'अतिपरिचयात अवज्ञा' असे एक संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ असा, की जास्त जवळीक झाली की अपमान होण्याची शक्यता बळावते. बिचाऱ्या कावळ्याच्या बाबतीत तसेच घडते. रोज अंगणात, खिडकीत, घराच्या छतावर काव काव करणाऱ्या कावळ्याला वामकुक्षी घेणाऱ्या गृहिणी हाकलून देतात. मात्र पितृपक्षात त्याच कावळ्याची अगतिकतेने वाट पहावी लागते. असे का? जाणून घेऊ. 

साधारण दशकभरापूर्वीपर्यंत कावळ्याची काव काव झाली, की अतिथी येणार असा संकेत मानला जात असे. आता लोक स्वत:च्याच घरात पाहुण्यांसारखे राहतात म्हटल्यावर कावळ्याची काव काव कोण मनावर घेणारे? मात्र ज्ञानेश्वरीत माऊलींनी त्याला केवढ्या आदराने म्हटले आहे, `पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' म्हणजे कावळ्याची 'काव काव' शकुन आहे, असे माऊली मानतात. नाहीतर आम्ही!

गोष्टीतला कावळा नेहमी बिचारा साधा-सुधा, शेणाचे घर बांधणारा आणि चिऊ ताईकडे आसरा मागणारा असल्याचे सांगितले जाते. परंतु, वास्तविक तसे नसून कावळ्याच्या घरट्याला एवढे महत्त्व आहे, की तो कधी घरटे बांधायला सुरुवात करतो आणि किती उंचावर घरटे बांधतो, यावरून पावसाची वर्दी कधी लागणार हे कळते. याचा अर्थ कावळा हवामान तज्ञ म्हटला पाहिजे, नाही का? पण गोष्टीतली चिऊ ताई भाव खाऊन जाते आणि तिथेही उपेक्षित राहतो, तो कावळाच!

काळ बदललाय! आपल्या बालपणी एक एक दगड माठात टाकून पाणी पिणारा कावळा आता बऱ्यापैकी स्मार्ट झाला आहे. तो थेट स्ट्रॉ टाकून पाणी पिऊ लागला आहे. मात्र स्वभाव तोच, भोळाबाबडा. अजूनही आपली पिले कोणती आणि कोकीळेची कोणती यात त्याची गल्लत होत असल्याने तो आपल्या आणि कोकीळेच्या पिलांचा एकत्र सांभाळ करतो. एकार्थी फुकटचे बेबी सिटींग करतो. तरी कुठेही वाच्यता करत नाही. 

अशा कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला, तेही आपले खाजगी वाहन म्हणून! कावळ्याचा भाव वधारला. त्याची चपळाई, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा हेरून यमराजांनी त्याला आपले दूत बनवले. म्हणून पितृपक्षात त्याला घरोघरी बोलावणे असते. कारण त्याला दिलेले अन्न यमराजाला आणि पर्यायाने पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे पंधरा दिवस कावळ्यासाठी मानाचे असतात. 

पितरांच्या वासना व नैवेद्य ठेवणाऱ्याचे कलुषित मन पिंडाभोवती घिरट्या घालत असेल, तर कावळा पिंडाला शिवतही नाही. एवढा तो मानी असतो. तो नैवेद्याजवळ बसेल, पण ढुंकून पाहणारही नाही. जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो, पितरांच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीची हमी देतो, तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवतो!

कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळाची लागवड होते. म्हणजे त्याच्याही नकळत तो वृक्षारोपणाची मोहीम राबवत असतो. त्याला घनदाट झाडीत राहायला आवडते. आपल्या निवासाची सोय तो स्वत:च करतो. जेवणाच्या बाबतीतही त्याचे नखरे नसतात. मिळेल ते खाऊन तो पोट भरतो म्हणून कायम फिट राहतो. 

कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो. त्यामुळे बाकीचे पक्षी संपावर गेले तरी कावळ्याचे दर्शन रोज घडते. या सर्व कारणांमुळे हा मोस्ट अव्हेलेबल पक्षी पितृपक्षात पितरांच्या नैवेद्याचा मानकरी ठरतो. 

Pitru Paksha 2021 : आपण अर्पण केलेला नैवेद्य पितरांपर्यंत कसा पोहोचतो याचे उत्तर मत्स्य व मार्कण्डेय पुराणांमध्ये सापडते; वाचा!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष