शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

Pitru Paksha 2021 : आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत असेल, तर पितृपक्षातील अष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 2:55 PM

Pitru Paksha 2021: पितर संतुष्ट असले तर देवीच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो. 

पितृ पक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी तिथीला हे व्रत केले जाते. या व्रताला गजलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. उत्तर भारतात हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. उद्या अष्टमी तिथी असल्याने आपणही या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

या दिवशी  देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवीचे वाहन म्हणून हत्तीचीदेखील पूजा केली जाते. गजलक्ष्मी व्रताच्या दिवशी हत्तीवर आरूढ झालेल्या देवीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. यासाठी माती, चांदी, कास्य, तांबे यापासून बनलेल्या मूर्तींचाही पूजेत वापर करता येतो. परंतु मूर्ती उपलब्ध नसेल तर प्रतिमेचे पूजन करता येते. 

दिवाळीतील लक्ष्मीपूजेसारखी ही पूजा देखील सायंकाळी सूर्यास्तानंतर केली जाते. देवीची षोडशोपचारे पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यावेळी देवीकडे आपल्यासाठी नाही, तर पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. पितर संतुष्ट असले तर देवीच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो. 

आता पाहूया पूजा विधी : 

  • महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी, लक्ष्मीच्या पूजेची जागा संध्याकाळी स्वच्छ करून घ्या. 
  • तिथे पाट किंवा चौरंग मांडून घ्या. 
  • त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. 
  • पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्या. 
  • त्यावर तांदुळाची रास रचून पाण्याचा कलश ठेवा. 
  • ताम्हनात लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. 
  • देवीला हळद कुंकू वाहून, सुंगंधी फुले अर्पण करा. 
  • फळांचा, मिठाईचा नैवेद्य दाखवा. 
  • पितरांचे स्मरण करा, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. 
  • देवीची आरती म्हणा. 
  • दुसऱ्या दिवशी पूजेतील प्रतिमा उचलून तांदूळ, मिठाई, फळे यांचे सत्पात्री दान करा. 
  • अशाप्रकारे सोप्या पद्धतीने गजक्ष्मी व्रत करता येते व पुण्य पदरात पाडून घेता येते. 
    टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष