शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Pithori Amavasya 2024: मातृसौख्य प्राप्त व्हावे म्हणून विशेषतः स्त्रिया करतात पिठोरी अमावस्येचे व्रत; वाचा व्रतविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:36 IST

Pithori Amavasya 2024: २ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या आहे, तिलाच पिठोरी अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर आलेले हे व्रत अधिक फलदायी ठरेल!

श्रावण वद्य अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा २ सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे. याला मातृदिन असेही म्हणतात. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्यादेखील म्हटले जाईल. 

आजच्या निरंतर वेगवान अशा विज्ञानयुगातही जी व्रते मोठ्या श्रद्धेने आचरली जातात, त्यात पिठोरी अमावस्या व्रताचाही समावेश होतो. हे स्त्रियांनी करायचे व्रत असून संततीविषयक दोष घालवणारे महत्त्वाचे व्रत मानले जाते. विशेषत: ज्या स्त्रिया संततीसुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते, अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे. 

हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. व्रतकत्र्या स्त्रीने या दिवशी उपास करून सायंकाळी पुनश्च स्नान करावे. नंतर व्रतसंकल्पाचे उच्चारण करून सर्वप्रथम गणपतीपूजनव वरुणावर पिठोरी देवतेचे आवाहन करावे. त्यानंतर सात कलश वा पंचपात्रांची स्थापना करून त्यावरील द्रोणात तांदूळ घालून त्यावर प्रत्येकी एक अशा सुपाऱ्या मांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे ब्राह्मी, माहेश्वरी कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुण्डा या सात मातांना आवाहन करून त्यांची पूजा करावी. षोडशोपचार पूजेनंतर सर्व देवतांना एक अर्घ्य आणि यथाशक्ती वाण द्यावे. संततीच्या वृद्धीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा. घरातल्या लहान मलांना मिष्टान्नभोजन वाढावे व यथाशक्ती दान करावे. 

या व्रताने संततीप्राप्ती होते. जिची संतती वाईट वळणाला, कुव्यसनाला, कुसंगतीला लागली असेल अशा मातेने हे व्रत केल्यास ससंतीविषयक त्या त्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे व्रत सर्व समाजातील स्त्रियांनी करावे. एका विशिष्ट कामनेने हे व्रत आचरले असल्यास कामनापूर्तीनंतर व्रतोद्यापन करावे व विधीपूर्वक सांगता करावी. 

आजच्या विज्ञानयुगात या व्रतांकडे अनेक जण उपहासाने पाहतात. परंतु, सगळे तोडगे विफल झाले की मनुष्य हतबल होतो आणि आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर व्रत वैकल्यातून आनंद मिळवतो. ते फळतील अशा आशेवर जगतो. ही आशा निर्माण करून जीवन सुखावह करण्याचे काम धर्मशास्त्राने केले आहे. ज्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्र उपचार करून रोगी शरीर बरे करण्याची आशा निर्माण करते, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रदेखील मानसिक आरोग्य सुधारून मनोबल वाढवण्याचे काम करते. 

या व्रतांचे तंतोतंत पालन करता आले नाही तरी हरकत नाही, परंतु या व्रताचे औचित्य साधून यथाशक्ती पूजा, अतिथी भोजन, दानधर्म आणि उपासना करून व्रत वैकल्यांची परंपरा पुढे न्यावी. कारण या व्रतांचा उद्देश मनुष्याला अंधश्रद्धेकडे नेणारा नसून सश्रद्ध बनवणारा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३