शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Meen Rashi Bhavishya 2022: मीन रास वार्षिक राशीभविष्य: नोकरीत पदोन्नती, करिअरमध्ये वृद्धी; कशी सुरु होईल साडसाती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:32 IST

Meen Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक राहू शकेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...

मीन राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ हे वर्ष अनुकूल राहील. या वर्षी तुम्ही आर्थिक स्वरूपात संपन्न राहाल. खास करून एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी कमाईचे नवीन स्रोत उत्पन्न  होतील. या व्यतिरिक्त, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये ग्रहांचे होणारे स्थान परिवर्तन तुमच्या जीवनात बरेच आर्थिक चढ उतार घेऊन येईल तसेच, करिअरच्या दृष्टीने मीन राशीतील व्यक्तींच्या इच्छेनुसार परिणाम प्राप्त होऊ शकतील. एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये गुरुचे संक्रमण हे कार्यस्थळी तुम्हाला आपल्या सहकर्मींसोबत उत्तम संबंध स्थापित करण्यात मदत करेल. यामुळे तुमची पदोन्नती होईल आणि तुम्ही वेतन वृद्धी प्राप्त करण्यास सक्षम ठराल.

विद्यार्थ्यां विषयी बोलायचे झाल्यास, वृश्चिक राशीमध्ये होत असलेले मंगळाचे संक्रमण शिक्षणात त्यांना सकारात्मक परिणाम देऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करून आपल्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात यशस्वी होऊ शकतील. तसेच, कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने मे महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्याची सर्वाधिक आवश्यकता ठरणार आहे. 

या वर्षी मे महिन्यात तीन ग्रह म्हणजे मंगळ, शुक्र आणि गुरु यांच्या युतीने तुम्हाला आपल्या कुटुंब आणि मोठ्यांचा आशीर्वाद देणारे आहे. दांपत्य जीवन पाहिल्यास हे वर्ष विवाहित जातकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. वर्षाच्या सुरवातीपासून मार्चपर्यंत उत्तम दांपत्य जीवनाचा आनंद घेता येऊ शकेल. २१ एप्रिलनंतर तुमच्या विवाहित जीवनात नवीन गोष्टी घडू शकतील. 

तसेच, मीन राशीच्या प्रेमी जातकांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे. परंतु, ग्रहांचे परिवर्तन कुणी तिसऱ्या व्यक्तीचे अचानक तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण बनेल. या वर्षी खासकरून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये लहान मोठ्या मुद्द्यांना घेऊन आपल्या जोडीदाराबरोबर वाद करणे टाळले पाहिजे.

सन २०२२ तुमच्यासाठी सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे आणि या वर्षी तुमच्या नातेवाईकांसोबत संबंध मधुर राहू शकतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य