शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पौष पौर्णिमा २०२६: आजची रात्र भाग्याची! फक्त पाणी आणि अक्षता वापरून करा 'हा' इच्छापूर्ती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:34 IST

Paush Purnima 2026: ३ जानेवारीच्या रात्री खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे बघून करा 'हा' सोपा उपाय; २०२६ मध्ये तुमची प्रत्येक अपूर्ण इच्छा होईल पूर्ण!

आज शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी पौष पौर्णिमा(Paush Purnima 2026) आहे. नवीन वर्षातील ही पहिलीच पौर्णिमा अत्यंत फलदायी मानली जाते. जर तुमची काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील किंवा अनेक दिवसांपासून एखादे महत्त्वाचे काम रेंगाळले असेल, तर ज्योतिष अभ्यासक भावना उपाध्याय यांनी सांगितलेला हा 'चंद्र-शिव' उपाय तुमच्यासाठी भाग्योदयाची गुरुकिल्ली ठरू शकतो.

Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर

इच्छापूर्तीसाठी काय करायचे? 

हा उपाय आज रात्री, जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसेल, तेव्हा करायचा आहे.

१. योग्य जागा निवडा: घराची खिडकी, गॅलरी, टेरेस किंवा अंगण अशा ठिकाणी जा, जिथून तुम्हाला पूर्ण चंद्राचे दर्शन होईल. २. साहित्य: एका स्वच्छ भांड्यात (शक्य असल्यास तांब्याच्या किंवा चांदीच्या) पाणी घ्या. त्या पाण्यात तांदळाचे काही अखंड दाणे (अक्षता) टाका. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. ३. मंत्र जप: चंद्राच्या प्रकाशात बसून डोळे मिटा आणि 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा (एक माळ) शांतपणे जप करा. ४. संकल्प आणि प्रार्थना: जप पूर्ण झाल्यावर महादेवाला आणि चंद्रदेवाला मनापासून प्रार्थना करा - "हे ईश्वरा, २०२६ या वर्षात माझी अडलेली सर्व कामे मार्गी लाव, माझ्या राहिलेल्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ मला दे." ५. जल अर्पण: प्रार्थना संपल्यानंतर ते अक्षतायुक्त पाणी घरातील कोणत्याही झाडाला किंवा कुंडीत अर्पण करा. (तुळशीच्या कुंडीत टाकू नये, इतर कोणत्याही झाडाला चालेल)

सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!

या उपायामागचे शास्त्र

पौष पौर्णिमेचा चंद्र हा सर्वात तेजस्वी असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि महादेव हे चंद्राला डोक्यावर धारण करणारे 'चंद्रशेखर' आहेत. तांदूळ आणि पाणी हे चंद्राचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करतो, तेव्हा पाण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे जल वृक्षाला अर्पण केल्याने आपली इच्छा निसर्गाच्या माध्यमातून ब्रह्मांडापर्यंत पोहोचते.

याचे फळ

>> मानसिक शांतता लाभते आणि आत्मविश्वास वाढतो.

>> रखडलेली कामे विनासायास पूर्ण होऊ लागतात.

>> नवीन वर्षात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. पाहा हा व्हिडिओ - 

Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 

English
हिंदी सारांश
Web Title : Paush Purnima 2026: Fulfill desires with water and Akshata tonight!

Web Summary : Paush Purnima on January 3, 2026, offers a chance to fulfill desires. Perform the Chandra-Shiva ritual using water, rice, and the 'Om Namah Shivaya' mantra for success and wish fulfillment in the new year. Offer the water to a plant (except Tulsi) after prayer.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण